IPL: ईशानची ऐतिहासिक कामगिरी, 10 वर्षात पहिल्यांदाच घडली 'ही' गोष्ट
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या (SRH vs RCB) विजयाचा हिरो ईशान किशन होता. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने 48 चेंडूत 7 चौकार आणि 5 उत्तुंग षटकारांसह 94 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या खेळीच्या जोरावर, हैदराबादने मार्यादित 20 षटकांत 231 धावा केल्या. ईशान किशनला त्याच्या कामगिरीबद्दल सामनावीर म्हणून पुरस्कृत करण्यात आले. या हंगामात ईशान किशन खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आयपीएल 2025 मध्ये असे काही केले आहे जे त्याच्या 10 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच घडले आहे. (ISHAN KISHAN WON PLAYER OF THE MATCH AWARD)
ईशान किशनने 2016 मध्ये गुजरात लायन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर, तो अनेक वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग राहिला, परंतु त्याला एका हंगामात दोनदा सामनावीराचा पुरस्कार मिळाला नाही. पण यावेळी त्याने ते करून दाखवले आहे. (ISHAN KISHAN WON TW0 POTM AWARD IN IPL 2025)
आरसीबीच्या आधी, त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. त्या सामन्यात ईशान किशनने शतकी खेळी केली होती. ज्यात तो 106 धावा करून नाबाद राहिला.
सनरायझर्स हैदराबादकडून आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये ईशान किशनने 1 शतकासह 325 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 36.11आणि स्ट्राईक रेट 153.30 आहे. गेल्या चार हंगामांपासून ईशान किशन आयपीएलमध्ये 300 धावांचा टप्पा ओलांडत आहे. मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला सोडले. लिलावात, सनरायझर्स हैदराबादने 11.25 कोटी रुपये खर्च करून त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. (ISHAN KISHAN PERFORMANCE IN IPL 2025)
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, हैदराबादनं दिलेल्या 232 धावांचा पाठलाग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दमदार सुरुवातीने केला. विराट कोहलीने केवळ 25 चेंडूत झंझावाती 43 धावा फटकावत पहिल्यापासूनच दबदबा निर्माण केला. त्याला फिल साॅल्टची जबरदस्त साथ मिळाली, ज्याने अवघ्या 32 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. दोघांनी मिळून अवघ्या 7 षटकांत 80 धावांची भागीदारी करत सामन्यावर पकड बसवली होती.
मात्र त्यानंतर बेंगळुरूच्या डावाला गळती लागली. मयंक अग्रवाल फक्त 11 धावांवर माघारी परतला, तर रजत पाटीदारने 18 धावा केल्या. कर्णधार जितेश शर्माने काहीसा प्रतिकार करत 15 चेंडूत 24 धावा केल्या. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी फारशी साथ दिली नाही.
शेवटी शेवटच्या षटकात बेंगळुरूचा डाव आटोपला. हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने जबरदस्त कामगिरी करत सर्वाधिक 3 बळी टिपले आणि सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला.
Comments are closed.