IPL2026: आरसीबीची घरून हकालपट्टी टळली! ‘या’ अटीवर बंगळूरुमध्ये होणार आयपीएल 2026 चे सामने

आयपीएल 2025 मध्ये (RCB) रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या विजयानंतर एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठा जल्लोष झाला होता. या दरम्यान मोठी गर्दी जमली आणि ती नियंत्रणात आणणे खूप कठीण झाले. त्यामुळे धावपळ झाली आणि दुर्दैवाने त्यात 11 लोकांचा जीव गेला. या घटनेनंतर, बंगळूरुमध्ये कोणताही मोठा सामना आयोजित करण्यात आला नव्हता आणि सर्व सामने दुसऱ्या ठिकाणी हलवले गेले होते. यामुळे असे मानले जात होते की RCB आता आपल्या होम ग्राउंड बंगळूरमध्ये खेळू शकणार नाही आणि त्यांना नवीन ठिकाण शोधावे लागेल.

11 डिसेंबर रोजी कर्नाटकात मंत्रिमंडळाची (Cabinet) बैठक झाली. या बैठकीत निर्णय घेण्यात आला की एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चे सामने होतील.
कर्नाटक सरकारने (KSCA) कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनला बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL आणि आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे.

KSCA ला सुरक्षा (Safety and Security) पूर्णपणे सुनिश्चित करावी लागेल. याशिवाय, KSCA ला न्यायमूर्ती जॉन मायकल कुन्हा आयोगाच्या शिफारसींचे पालन करावे लागेल.

अलीकडेच कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशनमध्ये नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक झाली होती, ज्यात व्यंकटेश प्रसाद यांनी मोठा विजय मिळवला होता. निवडणुकीनंतर त्यांनी सोशल मीडियावर येऊन सांगितले होते की, ते एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये क्रिकेट परत आणतील. त्यांनी दावा केला होता की IPL आणि आंतरराष्ट्रीय सामने बंगळूरुमधून दुसरीकडे हलवले जाणार नाहीत. आता त्यांची ही गोष्ट खरी ठरत आहे. विराट कोहली आणि RCB चे चाहते चिन्नास्वामी स्टेडियममध्ये IPL चा आनंद घेऊ शकतील.

इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम मार्च महिन्याच्या मध्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. लीगचा पहिला सामना 15 मार्च रोजी खेळला जाईल. अंतिम सामना 31 मे रोजी होईल, असे सांगितले जात आहे. यावेळी आयपीएलमध्ये सर्व संघ 14 नव्हे, तर 16-16 सामने खेळणार आहेत.

Comments are closed.