ऑरेंज-पर्पल कॅप जिंकणाऱ्यांना मोठी रक्कम मिळणार, बक्षिस म्हणून लाखोंची कमाई!

IPL Orange Cap and Purple Cap Prize Money: आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या संघावर पैशांचा पाऊस पडतो. याशिवाय, उपविजेत्या संघाला चांगली बक्षीस रक्कम मिळते, पण आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंना किती बक्षीस रक्कम मिळते हे तुम्हाला माहिती आहे का? खरंतर, या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते, पण बक्षीस म्हणून किती पैसे मिळतात? आयपीएल ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना 15 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतात.

गेल्या हंगामात पंजाब किंग्जच्या हर्षल पटेलने सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे हर्षल पटेलला पर्पल कॅप देण्यात आली. तसेच, त्याला बक्षीस म्हणून 15 लाख रुपये मिळाले. खरंतर, स्पर्धेत दोनदा पर्पल कॅप जिंकणाऱ्या निवडक खेळाडूंमध्ये हर्षल पटेलचे नाव आहे. यापूर्वी, ड्वेन ब्राव्होने आयपीएल 2013 आणि आयपीएल 2015 च्या हंगामात पर्पल कॅप जिंकली होती. तर, हर्षल पटेलने आयपीएल 2021 तसेच आयपीएल 2024 मध्ये पर्पल कॅप जिंकली. हर्षल पटेल आयपीएल 2021 च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता.

पण आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोण अव्वल स्थानावर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? खरं तर, डेव्हिड वॉर्नर या यादीत सर्वात वर आहे. आयपीएलच्या इतिहासात डेव्हिड वॉर्नरने विक्रमी 3 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. याशिवाय, ख्रिस गेल आणि विराट कोहली यांनी 2-2 वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर, शॉन मार्श, मॅथ्यू हेडन, सचिन तेंडुलकर, माइक हसी, रॉबिन उथप्पा, केव्हरिन विल्यमसन, केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, जोस बटलर आणि शुबमन गिल यांची नावे आहेत.

Comments are closed.