IPL 2026: आयपीएल इतिहासातील पर्पल कॅप विजेत्यांची संपूर्ण यादी; पाहा किती भारतीय खेळाडूंचा समावेश

इंडियन प्रीमियर लीगला (Indian premiere league 2026) सुरू होऊन 18 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 28 मार्चपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. गेल्या 19 वर्षांत अनेक विक्रम बनले आणि मोडले गेले. कोणी धावांचा डोंगर उभा केला, तर कोणी शतकांचा पाऊस पाडला. पण, आतापर्यंत केवळ 3 गोलंदाज असे आहेत, ज्यांनी दोनदा पर्पल कॅप जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
गेल्या 18 हंगामात एकूण 15 गोलंदाजांनी पर्पल कॅप जिंकली आहे. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि ड्वेन ब्राव्हो हेच असे खेळाडू आहेत, ज्यांनी 2 वेळा ही कॅप जिंकली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मोहित शर्मा, लसिथ मलिंगा आणि सोहेल तन्वीर यांसारख्या दिग्गज गोलंदाजांनीही हे यश मिळवले आहे.
आतापर्यंतच्या पर्पल कॅप विजेत्यांची यादी
2008 – सोहेल तन्वीर (RR)
2009 – आर.पी. सिंग (डेक्कन चार्जर्स)
2010 – प्रज्ञान ओझा (डेक्कन चार्जर्स)
2011 – लसिथ मलिंगा (MI)
2012 – मॉर्ने मॉर्केल (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
2013 – ड्वेन ब्राव्हो (CSK)
2014 – मोहित शर्मा (CSK)
2015 – ड्वेन ब्राव्हो (CSK)
2016 – भुवनेश्वर कुमार (SRH)
2017 – भुवनेश्वर कुमार (SRH)
2018 – अँड्र्यू टाय (PBKS)
2019 – इम्रान ताहिर (CSK)
2020 – कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स)
2021 – हर्षल पटेल (RCB)
2022 – युझवेंद्र चहल (RR)
2023 – मोहम्मद शमी (GT)
2024 – हर्षल पटेल (PBKS)
2025 – प्रसीध कृष्ण (GT)
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत फक्त 3 गोलंदाज असे आहेत, ज्यांनी एकाच हंगामात 30 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. ड्वेन ब्राव्होने 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळताना 32 विकेट्स घेतल्या होत्या. हा आजही एका हंगामातील सर्वाधिक विकेट्सचा विक्रम आहे. तसेच कागिसो रबाडाने 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना 30 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर हर्षल पटेलने देखील 2021 मध्ये आरसीबीसाठी खेळताना 32 विकेट्स घेऊन ड्वेन ब्राव्होच्या विक्रमाची बरोबरी केली होती. या तिघांशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला एकाच हंगामात 30 विकेट्सचा टप्पा गाठता आलेला नाही.
Comments are closed.