IPL इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार; राजस्थान रॉयल्सची 15 हजार कोटींहून अधिक किमतीत विक्री, खरेदीदार कोण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंतचा सर्वात मोठा ऐतिहासिक व्यवहार केला आहे. अमेरिकन उद्योगपती कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल 1.63 बिलियन डॉलर्स (सुमारे 15,286 कोटी रुपये) देऊन या फ्रेंचायझीची 100 टक्के भागीदारी विकत घेतली आहे. सोमानी यांना जगप्रसिद्ध ‘वॉलमार्ट’ कुटुंबातील रॉब वॉल्टन यांचा पाठिंबा असून, या व्यवहारामुळे राजस्थान रॉयल्स आता आयपीएलमधील सर्वात महागडा संघ ठरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या मोठ्या बदलाची प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. कल सोमानी हे 2021 पासून या संघात भागीदार म्हणून जोडलेले आहेत, मात्र आता संपूर्ण मालकी त्यांच्याकडे आली आहे. यापूर्वी मनोज बडाले यांच्याकडे संघाची मोठी हिस्सेदारी होती. दरम्यान, कोलंबिया पॅसिफिक कॅपिटल पार्टनर्सने देखील 1.7 बिलियन डॉलर्सची ऑफर दिली होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तो व्यवहार होऊ शकला नाही. आता आयपीएल 2026 नंतर संघाचे संपूर्ण व्यवस्थापन नवीन मालकांच्या हाती येईल.

पराग कर्णधार नव्हे ‘राजासाब’, श्रीकांत यांचा राजस्थानच्या संघनेतृत्वावर तुफानी हल्ला

राजस्थान रॉयल्सच्या या विक्रमी व्यवहारानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या विक्रीच्या चर्चांनाही उधाण आले आहे. राजस्थानला मिळालेली प्रचंड किंमत पाहता, आरसीबीची ब्रँड व्हॅल्यू आणि लोकप्रियता विचारात घेता ही फ्रेंचायझी 2 बिलियन डॉलर्सचा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Comments are closed.