IPL तिकिट खरेदीची संपूर्ण माहिती ! जाणून घ्या वेगवेगळया मैदानावर तिकिटांचे दर किती?
आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. क्रिकेटच्या या स्पर्धेचा आरंभ एका आठवड्यानंतर होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध बंगळुरू संघात खेळला जाणार आहे. सर्व संघांचे सुरुवाती सामन्यांची तिकिटे ऑनलाईन उपलब्ध झाली आहेत. चला तर जाणून घेऊया की तिकीट कसे आणि कुठे बुक करायचे.
एकूण 10 संघांमध्ये आयपीएल स्पर्धा खेळली जाणार आहे. सर्व संघांची ऑनलाइन तिकीट बुकिंग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चालू आहे. जसे की चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स सहित 5 संघाच्या सामन्यांची तिकिटे डिस्ट्रिक्ट . इन या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सुरुवाती सामन्यांची ऑनलाइन तिकीट विक्री चालू झाली आहे. तुमच्या माहितीसाठी डिस्ट्रिक्ट . इन ही वेबसाईट आयपीएल 2025 स्पर्धेतील पाच संघांची तिकीट पार्टनर आहे.
चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघाची तिकीट पार्टनर डिस्ट्रिक्ट . इन ही वेबसाईट आहे. तसेच या वेबसाईटवर या संघाच्या सामन्यांची ऑनलाइन तिकिटे तुम्ही खरेदी करू शकता.
जाणून घ्या की तिकीट बुक कसे करायचे?
सर्वप्रथम तुम्ही डिस्ट्रिक्ट . इन या वेबसाईटवर जावा. त्यानंतर इव्हेंट्स येथे जायचं, जिथे तुम्हाला आयपीएलच्या काही सामन्यांची तिकीट पोस्टर दिसेल. जर तुम्हाला सर्वसामान्यांची लिस्ट पाहिजे असेल, तर एक्सप्लोर मॅच या ऑप्शन वर क्लिक करायचे.
यानंतर तुमच्यासमोर या 5 संघाच्या सर्व घरेलु सामन्यांची लिस्ट येईल. ज्या सामन्यांची ऑनलाइन तिकीट विक्री चालू आहे. त्याच्यासमोर सेल इज लाइव्ह हा ऑप्शन येईल. तेथे बुक तिकीट वर क्लिक करायचे.
यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करावी लागेल. ज्याची तुम्हाला तिकीट खरेदी करायची आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सीट सिलेक्ट करू शकता. तुम्हाला किती तिकीटे खरेदी करायचे आहेत, ही माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला तिकीट बुक या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल पैसे भरल्यानंतर तुमचं तिकीट बुक होईल.
आयपीएल सामन्यांचे तिकीट किंमत
23 मार्च, राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद (SRH vs RR) 2,750 पासून 30000 पर्यंतची तिकिटे उपलब्ध
24 मार्च, एसीए वीडीसीए क्रिकेट स्टेडियम विशाखापटनम (DC vs LSG) 2,200 पासून 5000 पर्यंत ची तिकिटे उपलब्ध.
25 मार्च नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात ( GT vs PBKS) 499 पासून 20,000 पर्यंतची तिकिटे उपलब्ध
27 मार्च राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबाद (SRH vs LSG) 2250 पासून 20000 पर्यंतची तिकिटे उपलब्ध.
5 एप्रिल महाराजा यादविंन्द्र क्रिकेट स्टेडियम मोहाली ( PBKS vs KKR) 1750 पासून ते 12500 पर्यंत ची तिकिटे उपलब्ध
15 एप्रिल महाराजा यादविंन्द्र क्रिकेट स्टेडियम मोहाली (PBKS vs KKR)1750 पासून 12500 पर्यंत ची तिकिटे उपलब्ध.
याशिवाय कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स, या संघाची तिकिटे तुम्ही बुकमायशो या ॲप वर जाऊन बुक करू शकता. ती सर्व पद्धत या पद्धतीसारखीच आहे. ईडन गार्डन वर होणाऱ्या पहिल्या सामन्याचे तिकीट 3500 पासून सुरू होत आहे. तसेच वानखेडे स्टेडियम वरील सामन्यांच्या तिकिटाची सर्वात कमी किंमत म्हणजे 10,250 आहे. काही दिवसानंतर तिकीट स्वस्त होतील.
Comments are closed.