आयपीएलमध्ये खेळाडूंचा ट्रेड कसा होतो? जाणून घ्या नियम…

आयपीएल 2026 हंगामाचा मेगा लिलाव या वर्षाच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच सुरु झालेल्या ट्रेड विंडोमध्ये काही मोठी नावे संघ बदलू शकतात. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्या बदलीच्या चर्चा रंगल्या आहेत. आयपीएल ट्रेड विंडो हंगाम संपल्यानंतर एक महिना उघडी राहते आणि लिलावाच्या आठवडाभर आधी बंद होते.

आयपीएलमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण दोन प्रकारे होते, खेळाडूसाठी खेळाडू आणि रोख रकमेच्या बदल्यात. 2019 मध्ये शिखर धवनचा दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेला ट्रान्सफर हा खेळाडूसाठी खेळाडू कराराचा उदाहरण आहे. दुसऱ्या प्रकारात, मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनला 17.5 कोटींना आरसीबीला विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशात हार्दिक पंड्याला १५ कोटींना गुजरात टायटन्सकडून विकत घेतले.

फ्रँचायझी खेळाडूंची खरेदी-विक्री फक्त आर्थिक फायद्यासाठीच नव्हे, तर संघाच्या संतुलनासाठी देखील करतात. काहीवेळा ट्रेडद्वारे मिळणारी रक्कम लिलावातील किंमतीपेक्षा जास्त असते. मुंबई इंडियन्सच्या ग्रीन-पंड्या करारात 2.5 कोटींचा थेट नफा झाला. त्यामुळे अनेक संघ आर्थिक लाभ आणि संघबांधणी यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करतात.

याआधीही अनेक गाजलेले ट्रेड झाले आहेत. 2024 मध्ये हार्दिक पंड्या गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये आला, कॅमेरॉन ग्रीन आरसीबीमध्ये गेला, तर 2016 मध्ये केएल राहुल सनरायझर्समधून आरसीबीकडे गेला. आता 2026 च्या लिलावापूर्वी या ट्रेड विंडोमध्ये कोणते नवीन आणि धक्कादायक बदल घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सौदे होऊ शकतात. पुढील हंगामासाठी सर्व 10 फ्रँचायझी त्यांच्या संघांना बळकट करण्यासाठी आधीच बॅकडोअर व्यवहार करत आहेत.

Comments are closed.