राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार; राजस्थानचा विक्रमी ‘रॉयल’ करार, आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदारांची एण्ट्री
हिंदुस्थानच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा पैशांचा महापूर उसळला असून राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीचा तब्बल 1.63 अब्ज डॉलर (सुमारे 15,290 कोटी रुपये) इतक्या विक्रमी किमतीत करार झाला आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने या कंपनीने ही ऐतिहासिक खरेदी केली आहे. या सौद्यामुळे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार ठरणार आहे. या करारामुळे आयपीएल केवळ क्रिकेट राहिले नसून, अब्जावधींचा ग्लोबल बिझनेस प्लॅटफॉर्म बनल्याचे सिद्ध झाले आहे.
हा करार 19 व्या हंगामानंतर लागू होणार असून, सध्यासाठी संघाचे नियंत्रण विद्यमान व्यवस्थापनाकडेच राहणार आहे. ‘वॉलमार्ट’ आणि ‘फोर्ड’ परिवाराशी संबंधित गुंतवणूकदारांच्या सहभागामुळे या व्यवहाराला जागतिक वजन प्राप्त झाले असून आयपीएलमध्ये जागतिक गुंतवणूकदाराचीही जबरदस्त एण्ट्री झाली आहे. गेल्या वर्षी ‘टोरेंट ग्रुप’ने गुजरात टायटन्स संघातील 67 टक्के हिस्सेदारी ‘सीव्हीसी कॅपिटल पार्टनर्स’कडून 5025 कोटी रुपयांत विकत घेतली होती. त्या व्यवहारामुळे फ्रेंचाइजीचे मूल्य 7500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते, तर सीव्हीसीकडे 33 टक्के हिस्सा कायम राहिला होता.
भोगले व गांगुलीची ऐतिहासिक अभिप्राय
प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांनी सोशल मीडियावर या कराराची माहिती देत याला ऐतिहासिक करार म्हटले, तर टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीनेही या व्यवहारावर आनंद व्यक्त करीत आयपीएलसाठी ही मोठी सकारात्मक बातमी असल्याची प्रतिक्रिया दिली.
क्रीडा क्षेत्राशी कालावधी somananche नाते
गेल्या 15 वर्षांत काल सोमानी यांनी एड-टेक, डेटा गोपनीयता, एआय गव्हर्नन्स आणि स्पोर्ट्स टेक क्षेत्रात विविध उपक्रम उभारले आहेत. यापूर्वी त्यांनी मोटर सिटी गोल्फ क्लब, तसेच टीएमआरडब्ल्यू स्पोर्ट्स आणि टीजीएल गोल्फ लीगमध्येही गुंतवणूक केली आहे. ‘पीटीआय’च्या माहितीनुसार, हा व्यवहार बीसीसीआयच्या मंजुरीच्या अधीन असून, 2026 हंगामानंतर अधिकृतपणे लागू होणार आहे.
'rcb'हे विक्रीच्या उंबरठ्यावर?
दरम्यान, विद्यमान विजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) हेही विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संभाव्य व्यवहाराची किंमत तब्बल दोन अब्ज डॉलर्स (सुमारे 18,749 कोटी रुपये) इतकी असू शकते, अशी चर्चा रंगली आहे.
Comments are closed.