पैसे तयार ठेवा, येत्या आठवड्यात 5 आयपीओ येणार, 8 लिस्ट होणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु आहे.दुसरीकडे शेअर बाजारात आयपीओ मोठ्या प्रमाणावर येत आहेत. येत्या आठवड्यात 5 आयपीओ शेअर बाजारात खुले होणार आहेत. तर, 8 आयपीओ लिस्ट होणार आहेत. शेअर बाजारात जे पाच आयपीओ येणार आहेत त्यापैकी एक आयपीओ मेनबोर्ड असून चार एसएमई आयपीओ असतील.

लक्ष्मी डेंटल आयपीओ

पुढील आठवड्यात लक्ष्मी डेंटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ येणार आहे. लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आयपीओ मेनबोर्ड आयपीओ आहे. कंपनीकडून आयपीओच्या माध्यमातून 698.06 कोटी रुपयांची उभारणी करण्यात येणार आहे. कंपनी 138 कोटी रुपयांचे 32 लाख शेअर जारी करेल. तर, 560.06 कोटी रुपयांचे 1.31 कोटी शेअर ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील. हा आयपीओ 13 जानेवारीला बोली लावण्यासाठी खुला होईल. तर, 15 जानेवारीला बंद होईल. हा आयपीओ 20 जानेवारीला लिस्ट होईल.  या कंपनीच्या शेअरची दर्शनी किंमत  2 रुपये आहे.  आयपीओचा किंमतपट्टा 407-428 रुपयांदरम्यान आहे. एका लॉटमध्ये 33 शेअर होते. या आयपीओसाठी 14124 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. एक रिटेल गुंतवणूकदार 14 लॉट बुक करु शकेल.

एसएमई सेगमेंटमध्ये चार आयपीओ खुले होणार आहेत.यामध्ये काब्रा ज्वेल्स लिमिटेड, रिखाव सिक्युरीटीज लिमिटेडचे आयपीओ 15 जानेवारी ते 17 जानेवारी दरम्यान बोली लावण्यास खुले असतील. लँडमार्क इमिग्रेशनचा आयपीओ 16 जानेवारीला खुला होईल आणि 20 जानेवारीला बंद होईल. इएमए पार्टनर्स इंडिया लिमिटेडचा आयपीओ 17 जानेवारीला खुला होणार आहे तो आयपीओ 21 जानेवारीला बंद होईल.

लक्ष्मी डेंटलच्या आयपीओचा जीएमपी कितीवर?

लक्ष्मी डेंटल लिमिटेडचा आयपीओ हा मेनबोर्ड आयपीओ आहे. या आयपीओचा जीएमपी 160 रुपयांवर आहे. जीएमपीनुसार आयपीओचं लिस्टिंग झाल्यास गुंतवणूकदारांना 37.38 टक्के परतावा मिळू शकतो. एसएमई आयपीओबाबत काही डिटेल्स उपलब्ध झालेल्या नाहीत. दरम्यान, येत्या आठवड्यात 8 आयपीओ लिस्ट होणार आहेत. यामध्ये 3 मेन बोर्ड आणि 5 एसएमई बोर्ड आयपीओ आहेत.

इतर बातम्या :

Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?

IPO Update : पैसे तयार ठेवा, मुंबईतील कंपनी SME आयपीओ आणणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.