होर्मुझ सामुद्रधुनीवर आता इराण आणि ओमानची करडी नजर, सागरी वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही देशात मसुदा तयार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मार्ग म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz). या सागरी मार्गावरील सुरक्षेसाठी आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी इराण आणि ओमान या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोन्ही देशांनी देखरेख प्रोटोकॉलचा एक मसुदा तयार केला असून, यामुळे या भागातील सागरी हालचालींवर आता अधिक प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येणार आहे.

इराण आणि ओमानमधील लष्करी आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील एकूण तेल पुरवठ्याचा मोठा वाटा वाहून नेला जातो. या मार्गावर अनेकदा तांत्रिक बिघाड, जहाजांच्या धडकी किंवा राजकीय तणावामुळे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटना घडतात. हे टाळण्यासाठी आणि या भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य करण्याचा करार केला आहे.

या नवीन प्रोटोकॉलनुसार, इराण आणि ओमान एकमेकांशी रिअल-टाइम माहिती शेअर करणार आहेत. सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांच्या हालचाली, सागरी सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना मिळवण्यासाठी या करारामुळे मदत होणार आहे. विशेष म्हणजे, पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिका-इराणमधील संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दोन शेजारी राष्ट्रांनी घेतलेला हा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments are closed.