9 जुलैला खामेनींचा दफनविधी; मोहरममुळे तारीख पुढे ढकलली, दोन कोटी जनतेची उपस्थिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणकडून दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी ऊर्फ आयातुल्लाह खामेनी यांच्या अंत्यविधीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनानुसार शासकीय अंत्यविधी 4 जुलै रोजी सुरू होतील आणि 9 जुलै रोजी मशहद येथे दफनविधी होईल. या अंत्यविधीला दोन कोटी लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 28 फेब्रुवारीला तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता.

तेहरानचे महापौर अलीरेझा झाकानी यांनी निवेदनाद्वारे सांगितले की, दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांचा शासकीय अंत्यविधी पुढे ढकलण्यात आला आहे. मोहरमचे पारंपरिक विधी आणि शोकसभांमध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी हे करण्यात आले आहे. मोहरमनंतर 10 दिवसांनी अंत्यविधी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकांनी इमाम हुसेन यांच्यासाठी आपला वार्षिक शोक पूर्ण भक्तिभावाने आणि परंपरेनुसार पाळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Comments are closed.