इराणचा भीषण प्रतिहल्ला; दुबई, शारजाहसह अमेरिकन नौदल तळांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव, सॅटेलाइट इमेजमधून स्पष्ट

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या इराणने मध्यपूर्वेत भीषण प्रतिहल्ला सुरू केला आहे. मध्यपूर्वेतील सर्वात प्रदीर्घ काळ सत्तेत राहिलेल्या खामेनी यांच्या निधनानंतर, इराणने संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) दुबई, शारजाह आणि बहरीनमधील मनामा या प्रमुख शहरांना लक्ष्य केले आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण अरब जगतामध्ये खळबळ उडाली असून, या भागातील अनेक अमेरिकन लष्करी तळांवरही हल्ले करण्यात आले आहेत.

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध केलेल्या मोठ्या लष्करी मोहिमेनंतर हे प्रतिहल्ले झाले आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ खामेनी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या इराणची राजकीय सत्ता उलथवून टाकणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

मनामा येथील अमेरिकन नौदल तळ उद्ध्वस्त

बहरीनमधील मनामा येथे असलेल्या अमेरिकेच्या पाचव्या ताफ्याच्या (US Fifth Fleet) नौदल तळाला इराणने लक्ष्य केल्याचे सॅटेलाईट फोटोंमधून समोर आले आहे. या फोटोंच्या तुलनात्मक अभ्यासातून अमेरिकन सुविधेचे मोठे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या तळाच्या परिसरातून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. बहरीन सरकारनेही अमेरिकन नौदलाच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून, हा हल्ला देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्र हल्ल्यात फिफ्थ फ्लीट सर्व्हिस सेंटरला थेट फटका बसला असून, तातडीने आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. या हल्ल्यात जीवितहानी झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मध्यपूर्वेत युद्धाचा भडका

बहरीनमधील हा हल्ला मध्यपूर्वेतील लष्करी कारवायांच्या मोठ्या लाटेचा एक भाग आहे. कतार, कुवेत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अमेरिकेशी संबंधित अनेक लष्करी ठिकाणांना सध्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अनेक देशांनी आपली हवाई संरक्षण यंत्रणा (Air Defence System) सक्रिय केली आहे. इराणने या हल्ल्यांचे वर्णन ‘संरक्षणात्मक सूड’ असे केले असून, आपल्यावर झालेल्या आक्रमणाला हे चोख प्रत्युत्तर असल्याचे म्हटले आहे.

रविवारी पहाटे बहरीनची राजधानी मनामा येथील विमानतळावरही ड्रोनने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये किरकोळ नुकसान झाले आहे. मनामा येथील अमेरिकन दूतावासाने आपल्या नागरिकांना शहरातील हॉटेलमध्ये जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. ‘क्राउन प्लाझा’ या हॉटेलवर हल्ला झाल्यानंतर ही खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे, इराणने यावेळी केवळ लष्करीच नव्हे तर अबू धाबी, दुबई, दोहा, शारजाह आणि मनामा यांसारख्या बिगर-लष्करी शहरांनाही लक्ष्य केले आहे.

दुबई शारजाह अमेरिका पाचव्या नौदल तळावर इराणने प्रत्युत्तरादाखल हल्ला केला

अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने दुबई, शारजाह आणि बहरीनमधील आमच्या पाचव्या नौदल तळावर जोरदार हल्ले सुरू केले. मध्यपूर्वेमध्ये तणाव वाढत आहे. Tezzbuzz वर अपडेट्स.

कीवर्ड: सामना, सामना, सामना, दैनिक सामना, सामना, दैनिक सामना, इराण प्रतिशोध, दुबई शारजाह हल्ल्याच्या बातम्या, यूएस पाचवा फ्लीट मनामा, अयातुल्ला खामेनी मृत्यूच्या बातम्या, मध्य पूर्व युद्ध अद्यतने, मराठी बातम्या.

Comments are closed.