…तर आखातातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, अमेरिकेने नाकेबंदीची घोषणा केल्यानंतर इराणचा मोठा इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराण आणि अमेरिका यांच्यात पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेली शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने आखातातील तणाव पुन्हा वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्याची धमकी दिली. इराणची बंदरे आणि किनारपट्टीच्या भागांची नाकेबंदी करण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली आहे. यामुळे इराणही आक्रमक झाला आहे. आमच्या बंदरांना धोका निर्माण झाला तर पर्शियन आखात किंवा ओमानच्या उपसागरातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा मोठा इशारा इराणने दिला आहे. यामुळे जागतिक पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.

युद्धविराम चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणी बंदरांमध्ये येणाऱ्या किंवा तेथून जाणाऱ्या जहाजांना रोखण्यास सुरुवात करणार असल्याची घोषणा केली. यानंतर इराणचे लष्कर आणि ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’नी मोठा इशारा दिला. प्रादेशिक सागरी सुरक्षा ही सर्वांची सामायिक जबाबदारी असावी, असे त्यांनी म्हटले. पर्शियन आखात आणि ओमानच्या उपसागरातील सुरक्षा एकतर सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल आणि प्रदेशातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही, अशा धमकीवजाय इशाराही त्यांनी दिला. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेने इराणच्या नाकेबंदीची घोषणा केली. ही नाकेबंदी सकाळी 10 वाजल्यापासून लागू होईल, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले. पर्शियन आखात आणि ओमानच्या उपसागरातील इराणी बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या किंवा बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांना हा नियम लागू असेल. मात्र, बिगर-इराणी बंदरांदरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांना होर्मुझची सामुद्रधुनी पार करण्याची परवानगी असेल, असेही त्यांनी म्हटले.

Hormuz Blockade – तेलाची टंचाई, दरवाढ, वाढत्या महागाईचा धोका; हिंदुस्थानसह जगाला युद्धाच्या झळा

दरम्यान, अमेरिकेच्या घोषणेमुळे या भागातील सागरी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. युद्धविरामानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून काही प्रमाणात सुरू झालेली वाहतूकही आता मंदावली आहे. इराण, अमेरिका-इस्रायल संघर्षापूर्वी दररोज 100 ते 135 जहाजे येथून जात होती. आता ही संख्या 40 वर आली आहे.

असे पोप आम्हाला नकोत; डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, स्वत:चाच ‘देवदूत’ अवतारातील फोटो केला शेअर

Comments are closed.