अमेरिकेवर मोठी नामुष्की, इराणने एफ-35 विमान पाडले;पॉवरप्लॅण्ट उडवण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीला उत्तर

अमेरिकेने इराणमधील महत्त्वाचा पूल पाडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी पॉवरप्लॅण्टही उडवण्याची धमकी दिली. त्यानंतर इराणने अमेरिकेला आज मोठा हादरा दिला. अभेद्य आणि शत्रूला टिपता न येणारे अमेरिकेचे आणखी एक एफ-35 हे लढाऊ विमान इराणने पाडले. मुंबईतील इराणच्या वाणिज्य दूतावासाने याचा व्हिडीओ पोस्ट केला आणि एकच खळबळ उडाली.

इराणच्या हवाई दलाने अमेरिकेच्या एफ-35 विमानाला पाडल्याची माहिती दिली. हे अमेरिकेचे पाचव्या पिढीचे स्टेल्थ लढाऊ विमान आहे. इराणच्या हवाई दलाने विकसित केलेल्या नव्या हवाई सुरक्षा यंत्रणेद्वारे हे विमान पाडले. मुंबईतील वाणिज्य दूतावासाने यासंदर्भात टाकलेल्या पोस्टमध्ये पाडलेल्या एफ-35 विमानाची छायाचित्रे टाकली आहेत. हे विमान अमेरिकेचे असल्याचा पुरावादेखील त्यात दिला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या अधिकाऱयांनीदेखील विमान पाडण्यात आल्याचे मान्य केले असून वैमानिकाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र विमान एफ-35 नसून एफ-15 असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे. यापूर्वीदेखील 19 मार्च रोजी इराणने अमेरिकेचे एफ-35 विमान पाडले होते. याशिवाय गेल्या आठवडय़ात सौदी अरबमधील हवाई तळावर हल्ले करून हवेत इंधन भरणारी 5 विमाने नष्ट केली होती.

इस्रायलच्या 12 क्षेपणास्त्रांवर इराणचे 1 क्षेपणास्त्र पडले भारी

इराणच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र माऱयापुढे इस्रायलची हवाई सुरक्षा करणारे आयर्न डोम पार निष्प्रभ झाले आहे. इराणच्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात ही यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. एका व्हिडीओमध्ये इराणी क्षेपणास्त्राने आयर्न डोमला चकवत लक्ष्य अचूक भेदल्याचे दिसते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इराणचे क्षेपणास्त्र इास्रायलच्या तेलअवीवजवळ पोहोचताच आयर्न डोमने 12 क्षेपणास्त्र डागली. या क्षेपणास्त्रांना चकवत इराणचे क्लस्टर वॉरहेड क्षेपणास्त्र निशाण्यावर धडकले. आकाशातील हा थरार या व्हिडीओमध्ये दिसतो. ]

वैमानिकाला ताब्यात घेतल्याचे इराणने नाकारले

एफ-35 विमान पाडल्यानंतर त्याचा वैमानिक इराणच्या ताब्यात असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, इराणने हा दावा फेटाळला आहे. वैमानिकाने इजेक्ट करून प्राण वाचवले. मात्र, तो इराणच्या ताब्यात नाही. अमेरिकेच्या सैन्याने त्याचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली. मात्र, वैमानिकाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

इराणचे निम्मे रॉकेट लाँचर सुरक्षित, ट्रम्प यांचे दावे फोल

युद्धाला महिना लोटूनही इराणची अजूनही 50 टक्क्यांपेक्षा जास्त ड्रोन आणि क्षेपणास्त्र मारक क्षमता पूर्णपणे शाबूत आहे. इराणची समुद्रकिनारी तैनात असलेली क्रूझ क्षेपणास्त्रs शाबूत आहेत. त्यामुळे इराणचे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील वर्चस्व भक्कम आहे. इराणी सैन्यबळ मोठय़ा प्रमाणात नष्ट झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तो पूर्णपणे फोल ठरला आहे.

टाटा समूहाचे 10 हजार कर्मचारी युद्ध क्षेत्रात

टाटा समूहाच्या विविध पंपन्यांचा आखाती देशांमध्ये व्यवसाय पसरलेला आहे. या पंपन्यांमधील सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी टाटा समूहाने विशेष आराखडा तयार केला आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी समूहातील विविध पंपन्याच्या सीईओंसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यांना पुढील काही महिने सतर्क राहण्याची सूचना चंद्रशेखरन यांनी केली आहे.

तुम्ही एक पूल उडवला, आम्ही तुमचे 8 पूल उडवू

अमेरिकेने इराणमधील सर्वात मोठय़ा पुलावर हल्ला केला. तब्बल 3,800 कोटी रुपये खर्च करून बांधलेला करज शहरातील बी-1 पूल अमेरिकेने उद्ध्वस्त केला. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. आखातातील सर्वात उंच पूल म्हणून या पुलाची ओळख होती. याच वर्षी तो खुला करण्यात आला होता. हा पूल पाडल्यानंतर इराणने जशास तसे अशी भूमिका घेत आखातातील आठ प्रमुख पुलांवर हल्ल करण्याचा इशारा दिला आहे. या यादीत कुवैतमधील ‘शेख जाबेर अल-अहमद अल-सबाह कॉजवे’, यूएईतील ‘शेख झायेद पूल’, ‘अल मक्ता पूल’ आणि ‘शेख खलिफा पूल’, सौदी अरेबियाला बहरीनशी जोडणारा ‘किंग फहद कॉजवे’, तसेच जॉर्डनमधील ‘किंग हुसेन पूल’, ‘दामिया पूल’ आणि ‘अब्दुन पूल’ या प्रमुख पुलांना इराण लक्ष्य करणार आहे. महत्त्वाची शहरे आणि आखाताला जोडणारे हे अतिशय महत्त्वाचे पूल आहेत.

कुवेत आणि इस्रायलच्या तेल रिफायनरीवर हल्ला

इराणने इस्रायल आणि कुवेतच्या तेल रिफायनरीच्या ठिकाणांवर रॉकेट हल्ले केले. इस्रायलच्या हायफा आणि कुवेतच्या मीना अल-अहमदी पोर्टवरील रिफायनरींना लक्ष्य करण्यात आले. कुवेतमधील ही मोठी रिफायनरी असून दोन आठवडय़ांत तिसऱयांदा इराणने तेथे हल्ले केले आहेत. तसेच इस्रायलमधील हायफा शहरातील सर्वात मोठय़ा रिफायनरीवर इराणने दुसऱयांदा हल्ला केला. त्यात 6 जण जखमी झाले. या ठिकाणी इस्रायलच्या 70 टक्के कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाते.

ट्रम्प यांची धमकी, इराणचे प्रत्युत्तर

इराणमधील कराज येथील पूल पाडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली. खूप उशीर होण्यापूर्वी इराणने करार करावा. काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले. त्यावर इराणने आखातातील सर्व अमेरिकी पंपन्या जमीनदोस्त करू, असा इशारा दिला आहे. इराणच्या वीज प्रकल्प व पायाभूत सुविधांवर हल्ले कराल तर अमेरिकेच्या सर्व आयसीई कंपन्या आमच्या निशाण्यावर अजूनही आहेत. या सर्व कंपन्यांचा नायनाट करू, असा इशारा इराणच्या खतम अल अंबियाच्या प्रवक्त्याने दिला.

इराण हल्ल्यामागील ट्रम्प यांचा खरा मनसुबा उघड

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून नवा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, जर थोडा आणखी वेळ मिळाला, तर अमेरिका ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ सहजपणे खुली करू शकेल. यामुळे तेलाचा पुरवठा पुन्हा सुरू होईल आणि जगाला याचे महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. तेल साठय़ांवर ताबा घेऊन प्रचंड पैसे कमावता येतील. जगासाठी हे सोन्याची खाण सापडल्यासारखे ठरेल, असे ट्रम्प म्हणाले. या वक्तव्यावरून, इराणमधील तेल साठय़ांवर ताबा घेण्याचा ट्रम्प यांचा खरा मनसुबा उघड झाल्याचा दावा तज्ञांनी केला आहे.

 एफ-35 विमानाच्या वैमानिकांना शोधण्यासाठी इराणमध्ये शिरलेले अमेरिकेचे एक हेलिकॉप्टरदेखील इराणने पाडले. लढाऊ विमानाच्या वैमानिकाला वाचवण्यात आले असून दुसऱया वैमानिकाचा शोध सुरू आहे.

अमेरिकेची आखातातील सर्व ठिकाणे नष्ट करण्याचा इशारा

अमेरिकेने इराणमधील पुलाला लक्ष्य केल्यानंतर इराणने अमेरिकेला गंभीर इशारा दिला आहे. आमच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केल्यास अमेरिकेची आखातातील सर्व ठिकाणे नष्ट करू, असा इशारा इराणने दिला आहे. इराणच्या सैन्याचे प्रवत्ते इब्राहिम जोल्फाघरी यांनी सांगितले की, आमचे पूल, वीज निर्मिती पेंद्र किंवा ऊर्जा क्षेत्रांना तुम्ही स्पर्श जरी केला तर आम्ही तुमची या भागातील सर्व ठिकाणे नष्ट करू. ज्या देशांत अमेरिकेचे तळ आहेत, त्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे जोल्फाघरी यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.