बहरीनमधील अॅमेझॉनच्या डेटा सेंटरवर हल्ला
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे माघारीची भाषा करत असताना इराण अधिकच आक्रमक झाला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने आज थेट अमेरिकेची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनला लक्ष्य केले. बहरीनमधील अॅमेझॉनच्या डेटा सेंटरवर इराणने मिसाईल हल्ला चढवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
गुगल, मायक्रोसॉफ्टसह 18 मोठय़ा टेक कंपन्या इराणविरोधात अमेरिका-इस्रायलला तंत्रज्ञानाची रसद पुरवत आहेत. या कंपन्यांनी इराणविरोधी कारवाया बंद न केल्यास त्यांना लक्ष्य करण्याचा इशारा इराणने दिला होता.
बाटेल्को ही बहरीनमधील सर्वात मोठी
टेलिकॉम ऑपरेटर पंपनी असून अॅमेझॉनची उपकंपनी असलेल्या अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसला क्लाउड सेवा पुरवते. इराणच्या हल्ल्यामुळे या कंपनीच्या डेटा सेंटरला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे क्लाउड कम्प्युटिंग ऑपरेशन्स ठप्प झाले आहे.
दिवसभरात 100 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली
अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना आयआरजीसीने आज 100 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले. त्यात इस्रायलचे अनेक तळ आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.
इराणने केली शस्त्रसंधीची मागणी; ट्रम्प यांचा दावा
इराणने युद्ध थांबवून शस्त्रसंधी करण्याची मागणी केली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी एक्सवर पोस्ट करून इराणने शस्त्रसंधीची मागणी केल्याचे म्हटले आहे. पण इराणने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे खुली केली तर अमेरिका शस्त्र्ासंधीचा विचार करेल, अशी अट ट्रम्प यांनी घातली आहे. दरम्यान, ट्रम्प यांचा हा दावा इराणने फेटाळून लावला.
Comments are closed.