इराणने अखेर शत्रूला वाटाघाटींसाठी विनंती करण्यास भाग पाडले, अमेरिकेसोबतच्या संघर्षावर इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांचे वक्तव्य
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी मंगळवारी मोठा दावा करत म्हटले आहे की, अमेरिकेसोबतच्या अलीकडील युद्धात इराणने स्वतःला जगासमोर एक कठोर आणि अजिंक्य शक्ती म्हणून सिद्ध केले आहे. इराणच्या या खंबीर प्रतिकारामुळेच अखेर अमेरिकेसारख्या शत्रूला वाटाघाटींसाठी विनंती करण्यास भाग पडावे लागले. ANI ने यासंदभात
इराणमध्ये एका कार्यक्रमात बोलताना सय्यद अराघची म्हणाले की, इराणच्या सशस्त्र दलांनी प्राणांची आहुती दिली आणि जगातील सर्वांत मोठ्या लष्कराचा पराभव केला. ही केवळ घोषणा नसून एक वास्तव आहे, जे आज संपूर्ण जग मान्य करत आहे. अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांना सर्व पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाठिंबा असूनही इराण ज्या प्रकारे त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभा राहिला, त्याची कुणीही कल्पना केली नव्हती. इतर देशांच्या अधिकाऱ्यांनी इराणच्या या प्रतिकाराला एक चमत्कार म्हटले आहे, असा दावाही त्यांनी केला.
अराघची म्हणाले की, इराणने या संघर्षात नैतिकता आणि सन्मानही जिंकला आहे. त्यांनी हे यश इराणी जनतेच्या आणि युद्धकाळातही अविरत सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बलिदानाला समर्पित केले.
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले आहे की, ‘अमेरिकेचे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर १०० टक्के नियंत्रण’ आहे. ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “सध्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केवळ अमेरिकन नौदलाचे नियंत्रण आहे. आमची नाकेबंदी अभेद्य आहे. आम्ही ज्यांना परवानगी देऊ, तेच तिथे येऊ शकतात. आम्ही इराणला तिथे जाऊ देत नाही.”
Comments are closed.