सौदी, कतार, यूएई ते बहरीन…इराणचा जबरदस्त पलटवार, अमेरिकेच्या 7 लष्करी तळांवर क्षेपणास्त्रांची बरसात
इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने केलेल्या हल्ल्यामुळे इराण चवताळून उठला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलला धडा शिकवण्याचा विडा उचलला असून जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सात लष्करी तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून स्फोटांच्या आवाजाने अक्षरश: थरकाप उडत आहे. व्हिडीओ क्षेपणास्त्राचा स्फोट आणि त्या पाठोपाठ धुराचे लोट उठताना दिसत आहेत.
शुक्रवार इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह तीन ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. इराणने आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश दिले आणि आपले हवाई क्षेत्रही बंद केले. तसेच इस्रायलने आपल्या देशात आणीबाणी घोषित केली.
इस्रायलच्या हल्ल्यामुळे सैरभैर झालेल्या इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. सौदी अरब, यूएई, कतार, बहरीन, जॉर्डन, अबू धाबी आणि कुवैत या सात देशांवर इराणने क्षेपणास्त्रांची बरसात केली. इराणने प्रामुख्याने अमेरिकेच्या लष्करी आणि नौदलाला लक्ष्य केले. याचा अनेक व्हिडीओ समोर आले असून आगीचे आणि धुरोचा लोट यात दिसत आहेत.
इराणचा पलटवार, बहरीनमधील अमेरिकेच्या नौदल तळावर क्षेपणास्त्र हल्ला #इराण #इस्रायल pic.twitter.com/Y6gbN1PvAE
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 28 फेब्रुवारी 2026
बहरीन या देशातील अमेरिकन नौदल तळावालाही इराणने लक्ष्य केले आहे. इराणने या तळावर बॅलेस्टिक मिसाईलचा मारा केला. बहरीननेही याची पुष्टी केली आहे. इराणने आयलंड किंगडममधील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या मुख्यालयाला लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलच्या क्षेपणास्त्रांनी इराणमधील तब्रीझ येथील क्षेपणास्त्र लाँचरला लक्ष्य केले आहे.
दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी, कतारमधील दोहा आणि सौदी अरेबियामधील रियाधमध्येही स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यानंतर दोहा येथील एअरबेस बंद करण्यात आला आहे. दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
इराणचे क्षेपणास्त्रे आणि नौदल उद्ध्वस्त करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Comments are closed.