FIFA वर्ल्ड कपपूर्वी मोठा भडका! डोनाल्ड ट्रम्पचा सुरक्षेचा मुद्दा, इराणने तिकडेही दंड थोपटले
अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्ध बातम्या: अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोच्या संयुक्त यजमानपदाखाली यंदा फिफा विश्वचषक 2026 ची (FIFA World Cup 2026) सुरुवात 12 जूनपासून होणार आहे. या स्पर्धेत इराण (Iran national football team) देखील सहभागी होणार असून ती ग्रुप-जीमध्ये आहे. मात्र मिडल ईस्टमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ईराणच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटले होते की, सध्याच्या परिस्थितीत इराणच्या खेळाडूंना सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्या वर्ल्ड कपमधील उपस्थितीबाबत शंका निर्माण होते.
“इराणला कोणीही बाहेर करू शकत नाही…” (Iran Football Team on Donald Trump)
ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराण राष्ट्रीय फुटबॉल टीमने ठाम प्रतिक्रिया दिली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या माहितीनुसार, इराणया संघाने सोशल मीडियावर उत्तर देताना स्पष्ट केले की कोणत्याही देशाला इराणला वर्ल्ड कपमधून बाहेर काढण्याचा अधिकार नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका यजमान देश आहे आणि सहभागी संघांच्या खेळाडूंची सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांची जबाबदारी आहे. वर्ल्ड कप ही आंतरराष्ट्रीय आणि ऐतिहासिक स्पर्धा असून तिचे नियंत्रण फिफाकडे आहे, कोणत्याही एका देशाकडे नाही.
इराणच्या संघाने पुढे असेही सांगितले की, त्यांनी वर्ल्ड कपसाठी सर्वात आधी पात्रता मिळवलेल्या संघांपैकी एक म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळे ईराणला स्पर्धेतून बाहेर काढणे शक्य नाही. उलट जर कुणावर प्रश्न उपस्थित व्हायचा असेल तर तो त्या यजमान देशावर व्हायला हवा, जो सहभागी संघांच्या सुरक्षेची हमी देऊ शकत नाही.
ट्रम्प यांचे विधान काय होते? (What was Donald Trump Statement?)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना लिहिले होते की इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल टीमचे वर्ल्ड कपमध्ये स्वागत आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या उपस्थितीमुळे खेळाडूंच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. दरम्यान जियानी इन्फँटिनो, अध्यक्ष फिफा, यांनीही ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी स्पष्ट केले की ईराणचा संघ फिफा विश्वचषक 2026 मध्ये निश्चितपणे सहभागी होणार आहे.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.