Iran Israel War – ट्रम्पची स्पेनसोबत कट्टी फू… सैन्यतळ वापरण्यास नकार दिल्याने व्यापार बंद करण्याची धमकी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेनसोबतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणण्याची जाहीर धमकी दिली आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना स्पेनने पाठिंबा न दिल्याने आणि नाटोमधील आर्थिक योगदान वाढवण्यास नकार दिल्याने ट्रम्प यांनी हे कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.
मध्यपूर्वेतील युद्धात इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेणाऱ्या अमेरिकेला मित्रराष्ट्राने मोठा झटका दिला होता. स्पेनने आपल्या हवाई हद्दीतून अमेरिकन हवाई दलाच्या विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला होता. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या या भीषण संघर्षात सामील न होण्याचा निर्णय स्पेन सरकारने घेतला होता. यामुळे डोनाल्ड ट्रम्प चांगलेच भडकले आहेत.
बातमी अपडेट होत आहे…
Comments are closed.