Israel Iran War – अमेरिकेने केली Doomsday क्षेपणास्त्राची चाचणी; हिरोशिमापेक्षाही जास्त विनाशकारी ठरणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिका, इस्रायल इराण युद्धाचा आज सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशीही युद्धाची तीव्रता कायम आहे. आता अमेरिकेने जगाची चिंता आणखी वाढवली आहे. या युद्धादरम्यान अमेरिकेने मंगळवारी रात्री कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर Doomsday या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २० पट जास्त शक्तिशाली अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले मिनिटमन III बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, सांता बारबराजवळील वँडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून रात्री 11 वाजता चाचणीसाठी सोडण्यात आले. अमेरिकेचे हे क्षेपणास्त्र हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा जास्त विनाश घडवू शकते. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

अमेरिकेने कॅलिफोर्निया येथून मिनिटमन-III बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ही चाचणी नियमीत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. मात्र, अण्वस्त्र क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची चाचणी जगाची चिंता वाढवत आहे. यूएस स्पेस फोर्सने सांगितले की, GT254 म्हणून ओळखले जाणारे निशस्त्र रॉकेट पश्चिम-मध्य पॅसिफिक महासागरातील मार्शल बेटांजवळ त्याच्या लक्ष्यावर उतरले. फोर्स ग्लोबल स्ट्राइक कमांडने म्हटले की, प्रभावीता, तयारी आणि अचूकता पडताळण्यासाठी या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यामुळे आम्हाला क्षेपणास्त्र प्रणालीच्या विविध घटकांच्या कामगिरीचे मूल्यांकन करता आले, असे ५७६ व्या फ्लाइट टेस्ट स्क्वॉड्रनचे कमांडर लेफ्टनंट कर्नल कॅरी रे यांनी एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे.

अलीकडेच, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला आणि तेहरानमध्ये देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची हत्या केली. त्यानंतर आखाती देशात तीव्र युद्ध सुरू झाले आहे. खामेनी यांच्या मृत्युनंतर इराणने इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, हिजबुल्लाहच्या सक्रियतेनंतर, इस्रायलने लेबनॉनची राजधानी बैरूतवर हल्ले करण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातच आता अमेरिकेच्या या चाचणीने जगाची चिंता वाढवली आहे.

Comments are closed.