सूड! बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचे क्षेपणास्त्र

अमेरिकेने खर्ग बेटावर हल्ले केल्यानंतर इराणने जोरदार प्रत्युत्तर दिले. इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर इराणने क्षेपणास्त्र डागले. तसेच ड्रोनने अमेरिकन दूतावासाच्या रडार सिस्टमलाही लक्ष्य केले. दरम्यान, या हल्ल्यामुळे अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे.

बगदादमधील संरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या ‘ग्रीन झोन’मध्ये अमेरिकन दूतावास आहे. दूतावासाच्या आवारात हेलिपॅड आहे. तसेच अमेरिकन लष्कराचा मोठा बंदोबस्त आहे. दूतावासावरील रडार बगदादमधील अमेरिकी दूतावासावर इराणचे क्षेपणास्त्र

सिस्टमलाच इराणने पहिल्यांदा लक्ष्य केले. या रडार सिस्टीमवर ड्रोनने हल्ला केला. त्यानंतर दूतावासावर क्षेपणास्त्र्ा डागले. हल्ल्यानंतर दूतावासातून आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसत आहेत. दरम्यान इराणच्या या हल्ल्यात किती जीवितहानी पिंवा कोणते नुकसान झाले याची अमेरिकेने अद्याप पुष्टी केलेली नाही, मात्र दूतावासाचे मोठे नुकसान झाले आहे. दूतावासाच्या परिसराला अमेरिकन सैनिकांनी वेढा टाकला आहे. दरम्यान, इस्लामिक रेझिस्टन्सने शुक्रवारी एक निवेदन जारी केले. इराकमधील अमेरिकन सैनिक पिंवा गुप्तचर कर्मचारी यांना टार्गेट करण्यासाठी मदत करणाऱ्यांना एक लाख डॉलरचे बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

इस्लामिक रेझिस्टन्स गटाकडून बदला

इराकमध्ये इस्लामिक रेझिस्टन्स हा इराणसमर्थक गट सक्रिय आहे. या गटाने इराणचे सर्वोच्च अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. या गटाने बगदादमधील अमेरिकन दूतावासावर क्षेपणास्त्र्ा डागल्याचे वृत्त आहे.

‘बीबी’ तुम्ही कुठे आहात?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यातून ते जिवंत आहेत का, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे. बेंजामिन नेतान्याहू यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यांनी इराण युद्धाबाबत माहिती दिली. मात्र, त्यांच्या उजव्या हाताला सहा बोटे असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ एआयद्वारे तयार करण्यात आल्याचा दावा अनेकांनी केला, तर एकाने लिहिले, हे बीबी तुम्ही एवढे खास आहात की, तुम्हाला सहा बोटे आहेत किंवा तुम्ही बरेच आधी आम्हाला सोडून गेला? बीबी हे नेतान्याहू यांचे टोपणनाव आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धनौका पाठवणार

डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, कोणत्याही परिस्थितीत आम्ही होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला आणि सुरक्षित करू. सामुद्रधुनी बंद असल्यामुळे प्रभावित झालेले चीन, फ्रान्स, जपान, ब्रिटनसारखे देश आपल्या युद्धनौका पाठवू शकतात. इराणची 100 टक्के लष्करी क्षमता नष्ट केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला.

मोठे पोर्ट रिकामे करा, इराणचा यूएईला इशारा

इराणने यूएईच्या नागरिकांना मोठा इशारा दिला आहे. देशातील मोठे पोर्ट तसेच जवळपासचा परिसर रिकामा करा. या ठिकाणी अमेरिकन लष्करी ठिकाणे आहेत. तेथे आम्ही लक्ष्य करणार आहोत. दुबईतील जेबेल अली, अबू धाबीतील खलीफा आणि फुजैरातील मीना अल-फुजैरा या पोर्टच्या जवळपासच्या लोकांनी तत्काळ परिसर रिकामा करावा, असा इशारा इराणने दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हिंदुस्थानात येणार

ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक लॉरा लूमर या सध्या हिंदुस्थानात आहेत. का कार्यक्रमात त्यांनी ट्रम्प यांनी दिलेला संदेश वाचून दाखवला. ट्रम्प यांचे हिंदुस्थानवर प्रेम आहे. ते पंतप्रधान मोदींवर प्रेम करतात. मला हिंदुस्थानातील लोक आवडतात. पंतप्रधान मोदी हे एक उत्तम नेते आहेत आणि चांगले मित्र आहेत. मी लवकरच हिंदुस्थानच्या दौयावर येईल, असे ट्रम्प यांनी मला सांगितल्याचे लूमर म्हणाल्या.

अमेरिकेची पाच विमाने उद्ध्वस्त

अमेरिकेच्या हवाई दलाला आज मोठा फटका बसला आहे. सौदी अरबमधील प्रिंस सुलतान हवाई तळावर उभ्या असलेल्या अमेरिकेच्या विमानांना इराणने लक्ष्य केले. इराणने या विमानांवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. त्यात पाच विमानांचे मोठे नुकसान झाले आहे. ही टँकर विमाने असून लढाऊ विमानांमध्ये हवेत इंधन भरण्यासाठी या विमानांचा वापर केला जातो. यामुळे ट्रम्प यांचा युद्ध जिंकल्याचा दावा पह्ल ठरला आहे.

Comments are closed.