FIFA World Cup 2026 – आम्ही अमेरिकेत अभिमानाने आलो, सन्मानाने खेळलो अन्…इराणच्या खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये सोडली चिठ्ठी हटून आल्या
इराण एकीकडे युद्धात होरपळला जात आहे, पण दुसरीकडे त्यांच्यातल्या हळव्या स्वभावाचे दर्शन फिफा वर्ल्ड कपमध्ये झाले. बेल्जियमविरुद्ध सामना बरोबरीत सुटल्यानंतर इराणी खेळाडूंनी येथील सोफी स्टेडियमला भावनिक निरोप दिला. त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये एक चिठ्ठी ठेवली आहे, जी वाचल्यावर प्रत्येक क्रीडाप्रेमीचे मन भारावल्यावाचून राहणार नाही.
इराणी संघाची खास चिठ्ठी
इराणी संघाची एक खास चिठ्ठी सोशल मीडियावर समोर आली आहे, ज्यामुळे लॉस एंजेलिसला दिलेल्या त्यांच्या निरोपाला एक भावनिक वळण मिळाले आहे. चिठ्ठीत लिहिले आहे, ‘हजारो वर्षे जुनी, प्राचीन पर्शियाची भावना आजही जिवंत आणि अविचल आहे, जी आधुनिक सुसंस्कृत इराणपर्यंत विस्तारलेली आहे. लॉस एंजेलिस, तुमच्या पाहुणचाराबद्दल धन्यवाद! आम्ही येथे अभिमानाने आलो, सन्मानाने खेळलो आणि आदराने निरोप घेत आहोत.’
विश्वचषक 2026 मध्ये इराणसमोर अडचणी
फिफा विश्वचषक 2026 पर्यंतचा इराणी संघाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अमेरिकेतील निर्बंधांमुळे खेळाडूंना 48 तासांपेक्षा जास्त काळ थांबण्याची परवानगी नव्हती, पण त्यांना मेक्सिकोमधील तिजुआना येथे तळ ठोकावा लागला. याव्यतिरिक्त काही खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱयांना व्हिसाच्या समस्यांना सामोरे जावे लागले.
लॉस एंजेलिस इराणचे घरचे मैदान बनले
लॉस एंजेलिसमधील स्टेडियम इराणला घरच्या मैदानासारखे वाटत होते. संघाला पाठिंबा देण्यासाठी लाखो इराणी चाहते स्टेडियममध्ये जमले होते, याचे एक कारण म्हणजे, लॉस एंजेलिस हे जगातील सर्वात मोठय़ा इराणी समुदायांपैकी एक घर आहे. चाहत्यांचे आभार मानणाऱया एका संदेशात संघाने लिहिले की, ‘खेळाच्या 180 मिनिटांमध्ये आम्हाला न सोडणाऱया प्रत्येक इराणी चाहत्याचे आभार! तुम्ही तुमच्या आवाजाने आणि उत्साहाने आम्हाला पाठिंबा दिला. आमच्यासाठी ही सर्वात मोठी गोष्ट आहे.’
Comments are closed.