होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इस्रायलच्या युद्धखोरीला इराणचे प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेसोबतच्या शांतता करारावर स्वाक्षरी करून 48 तास उलटत नाहीत तोच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने हा निर्णय घेतला. त्यामुळे जगाचे टेन्शन वाढले आहे.

होर्मुझ खुले करणे व लेबनॉनसह सर्व आघाडय़ांवरील हल्ले थांबवणे या शांतता करारातील प्रमुख अटी होत्या. त्यानुसार करारावर स्वाक्षरी होताच होर्मुझ खुले करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अमेरिकेनेही इराणची सागरी नाकेबंदी उठवली होती. मात्र, इस्रायलने लेबनॉनवर हल्ला चढवला. त्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर इराणने होर्मुझ बंदीची घोषणा केली. कोणत्याही जहाजाने होर्मुझ ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन इराणने केले आहे.

Comments are closed.