Iran US Israel War – आखातात युद्धाचा भडका; अमेरिकेचे C-130 विमान पाडल्याचा इराणचा दावा, रेस्क्यू ऑपरेशनवेळी 5 जण ठार
मध्य पूर्वेतील तणाव आता टोकाला पोहोचला असून इराणने अमेरिकेचे C-130 मालवाहू विमान पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम संपुष्टात येत असतानाच ही घटना घडली आहे. तसेच अमेरिकन पायलटचे रेस्क्यू करताना मोठी धुमश्चक्री उडाली आणि पाच जण ठार झाल्याचा दावाही इराणने केला आहे. दुसरीकडे इराणने C-130 विमान पाडल्याचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. ‘इस्रायलचा टाईम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
एफ-15 विमान पाडल्यानंतर बेपत्ता झालेल्या पायलटचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली होती. या मोहिमेसाठी एक डझनहून अधिक विमाने पाठवण्यात आल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. याच शोध मोहिमेदरम्यान इराणने अमेरिकेचे C-130 विमान आणि काही उडणाऱ्या गोष्टी पाडल्याचा दावा केला आहे.
Comments are closed.