इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू, अमेरिका-इस्रायल बेफाम… तेहरानसह अनेक शहरांवर 24 तासांत 1200 बॉम्ब टाकले

अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू झालेल्या युद्धाने आज टोक गाठले. इराणच्या जबरदस्त प्रतिहल्ल्यामुळे बेभान व बेफाम झालेल्या अमेरिका आणि इस्रायलने 24 तासांत इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर तब्बल 1200 बॉम्ब टाकले. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च नेते 86 वर्षीय अयातुल्लाह खामेनी यांचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी, जावई आणि नातूही मारला गेला आहे. त्यामुळे इराणमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला आहे. इराणमध्ये 40 दिवसांचा, तर अरब देशांमध्ये तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. खामेनी यांचे हंगामी उत्तराधिकारी म्हणून अलिरेझा अराफी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. खामेनींच्या मृत्यूचे वृत्त पसरताच इराणमध्ये संतापाचा आगडोंब उसळला असून लाखो नागरिक अमेरिका व इस्रायलचा निषेध करत रस्त्यावर उतरले. ‘शरण जाऊ नका… लढत राहा… डेथ टू अमेरिका…’ अशी साद त्यांनी नव्या नेतृत्वाला घातली.

अण्वस्त्र प्रसाराच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्याने इस्रायल व अमेरिकेने शनिवारी इराणवर हल्ला चढवला. हा हल्ला करतानाच आमचे मुख्य लक्ष्य खामेनी असल्याचे अमेरिका व इस्रायलने स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर खामेनी यांनी तेहरान सोडून सुरक्षित स्थळी आश्रय घेतल्याचे वृत्त होते, मात्र अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ खामेनी यांच्या मागावर होती. खामेनी हे तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमेरिका-इस्रायलने तेथे तब्बल 30 बंकर बस्टर बॉम्ब टाकले. हल्ला झाला तेव्हा खामेनी हे निवासस्थानातच असलेल्या आपल्या कार्यालयात संरक्षण मंत्री, लष्कराचे कमांडर आणि इतर सल्लागारांसोबत चर्चा करत होते. अमेरिकेच्या हल्ल्यात या सर्वांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी ही बातमी दिली. त्यानंतर इराणने त्यास दुजोरा दिला.

कसा असतो बंकर बस्टर बॉम्ब?

खामेनी यांच्यावर हल्ल्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला. या प्रकारचा बॉम्ब सध्या केवळ अमेरिकी लष्कराकडे असल्याचे बोलले जाते. हा बॉम्ब अंदाजे 13.6 टन वजनाचा आणि 20 फुटांपेक्षा जास्त लांबीचा असतो. बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरमधून ते टाकले जातात. शत्रूच्या रडारला चुकवण्याची क्षमता यात असते. बंकर बस्टर बॉम्बला नाकासारखे एक टोक असते. त्याच्या मदतीने हे बॉम्ब काँक्रीट आणि खडकाला भेदून काही मीटर आतमध्ये जाऊन फुटतात. हा बॉम्ब इतका मजबूत असतो की जमिनीखालील बंकर आणि आण्विक यंत्रणाही उद्ध्वस्त करून टाकतो.

मौन सोडा; इराणचे जगाला आवाहन

खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणने जगभरातील देशांना आवाहन केले आहे. जगातील स्वायत्त सरकारांनी अमेरिका व इस्रायलच्या हल्ल्यांचा कठोर आणि ठाम शब्दांत निषेध करावा. अमेरिका-इस्रायलने जे केले, तो क्रूर गुन्हा आहे. हे बेकायदेशीर कृत्य असून त्यावर मौन सोडा, असे हिंदुस्थानातील इराणी दूतावासाने म्हटले आहे.

मुंबईसह देशभरात मुस्लिमांची निदर्शने

खामेनी यांच्या हत्येनंतर इराणच्या समर्थनार्थ जगभरात लोक रस्त्यावर उतरले आहेत. हिंदुस्थानही यास अपवाद नाही. मुंबईसह देशभरात आज हजारो शिया मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून अमेरिका व इस्रायलच्या विरोधात निदर्शने केली. मुंबईत ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाने छोटा इमामबारा येथे निदर्शने केली. जम्मू-कश्मीरमध्ये श्रीनगर, बडगाम येथे लोक रस्त्यावर उतरले. लेहमध्येही मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला. लखनऊमध्येदेखील शेकडो लोकांनी इस्रायल व अमेरिकेचा निषेध केला. चर्चा करत होते. अमेरिकेच्या हल्ल्यात या सर्वांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी ही बातमी दिली. त्यानंतर इराणने त्यास दुजोरा दिला.

कसा असतो बंकर बस्टर बॉम्ब?

खामेनी यांच्यावर हल्ल्यासाठी अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बचा वापर केला. या प्रकारचा बॉम्ब सध्या केवळ अमेरिकी लष्कराकडे असल्याचे बोलले जाते. हा बॉम्ब अंदाजे 13.6 टन वजनाचा आणि 20 फुटांपेक्षा जास्त लांबीचा असतो. बी-2 स्पिरिट स्टेल्थ बॉम्बरमधून ते टाकले जातात. शत्रूच्या रडारला चुकवण्याची क्षमता यात असते. बंकर बस्टर बॉम्बला नाकासारखे एक टोक असते. त्याच्या मदतीने हे बॉम्ब काँक्रीट आणि खडकाला भेदून काही मीटर आतमध्ये जाऊन फुटतात. हा बॉम्ब इतका मजबूत असतो की जमिनीखालील बंकर आणि आण्विक यंत्रणाही उद्ध्वस्त करून टाकतो.

इराणचे सीडीएस मौसवी ठार

अमेरिका व इस्रायलच्या हवाई हल्ल्यात इराणी लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ अब्दुलरहीम मौसवी हेदेखील मारले गेले आहेत. याशिवाय, लष्करप्रमुख जनरल मोहम्मद पाकपौर यांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत इराणचे जवळपास 40 उच्चपदस्थ अधिकारी हल्ल्यात मारले गेले आहेत.

अमेरिकेचे तीन सैनिक ठार

खामेनी यांच्या मृत्यूनंतरही इराणने अमेरिका व इस्रायलवर प्रतिहल्ले सुरूच ठेवले आहेत. इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक मारले गेले असून पाच गंभीर जखमी झाले आहेत. अमेरिकेने त्यास दुजोरा दिला आहे. अमेरिकेच्या लिंकन विमानवाहू जहाजावर चार मिसाईल डागल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र तो फसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. इस्रायलवर इराणने केलेल्या हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर यूएईमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आमच्या हल्ल्यात इराणचे 48 नेते मारले गेल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

कराचीतील अमेरिकन दूतावासावर जमावाचा हल्ला, निदर्शकांवर गोळीबार, 12 ठार

खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱया जमावाने कराचीतील अमेरिकी दूतावासावर हल्ला केला. दूतावासाला आग लावण्याचाही प्रयत्न झाला. यावेळी अमेरिकी सागरी सुरक्षा रक्षकांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात 12 जण ठार झाले असून सुमारे 30 जण जखमी झाले.

Comments are closed.