युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, अमेरिकन शेअर बाजारातही विक्रमी तेजी

इराण यूएस युद्ध युद्धविराम: मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या इराण-अमेरिका (Iran US War Update) यांच्यातील युद्धासंदर्भात एक अतिशय महत्वाची आणि संपूर्ण जगाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी युद्धविराम (Ceasefire) जाहीर केला आहे. ट्रम्प यांनी मंगळवारी (7 एप्रिल) जाहीर केले की, अमेरिका इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमत झाली आहे. त्यांनी इराणवर मोठा हल्ला करण्याची आणि तेथील संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याची धमकी दिल्यानंतर काही तासांतच हे विधान केले. हा युद्धविराम घडवून आणण्यात पाकिस्ताननेही महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. इराण युद्धातील युद्धविरामाच्या घोषणेनंतर दिलासा मिळाल्याने, कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आणि अमेरिकन शेअर बाजारात (Share Market) तेजी दिसून आली.

Iran US War Update : कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत घसरल्या, आर्थिक आघाडीवर ही तेजी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केली आहे. त्यांनी दोन आठवड्यांसाठी लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर शेअर बाजारात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेने इराणसोबत युद्धविरामाची घोषणा केल्याने शेअर बाजारांना दिलासा मिळाला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीही प्रति बॅरल 100 डॉलरपर्यंत मोठ्या प्रमाणात घसरल्या. तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी तेजी आल्याचं दिसून आलं आहे. डाऊ जोन्स फ्युचर्स 900 अंकांनी वधारले. अध्यक्ष ट्रम्प यांनी इराण युद्धात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर आर्थिक आघाडीवर ही तेजी दिसून येत आहे. आज बाजार उघडल्यानंतर भारतासह आशियाई बाजारांमध्येही अशीच तेजी दिसू शकते. निफ्टी ग्रीन झोनमध्ये प्रवेश करून असेच संकेत देत आहे.

Iran US War Ceasefire: होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे पुन्हा सुरू करण्याच्या अटीवर युद्धविराम

दरम्यनअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ आणि सुरक्षितपणे पुन्हा सुरू करण्याच्या अटीवर इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामास सहमती दर्शवल्याचे सांगितल्यानंतर, बुधवारी अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल जवळपास 20 डॉलरची घसरण झाली. मे महिन्याच्या डिलिव्हरीसाठीच्या WTI कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 18.10 डॉलरने, म्हणजेच 16.02 टक्क्यांनी घसरून 94.85 डॉलर झाली. यापूर्वी ही किंमत 26 मार्चनंतरच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच 91.05 डॉलरवर पोहोचली होती. जगातील सुमारे 20% तेल वाहून नेणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुन्हा वाहतूक करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या मुदतीच्या अगदी आधी ही युद्धविरामाची घोषणा करण्यात आली.

Iran US War Ceasefire:  पाकिस्तानच्या विनंतीनंतर ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आला. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, तणाव कमी करण्यासाठी इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.