Iran War – आखातातील युद्धाच्या आगीत चीनने ओतले तेल, अमेरिकेच्या लष्करी तळांचे सॅटेलाइट फोटो इराणला पुरवले!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका-इस्त्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या आॅपरेशन एपिक फ्युरी या लष्करी कारवाईपूर्वी इंटरनेटवर काही रहस्यमय सॅटेलाइट फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या फोटोंमध्ये अरब देशांमधील अमेरिकन लष्करी तळ, विमानांची तैनाती आणि संरक्षण प्रणालींची अत्यंत तपशीलवार माहिती दिसत होती. विशेष म्हणजे या फोटोंवरील माहिती इंग्रजीऐवजी चिनी भाषेत देण्यात आली होती. त्यामुळे इराण युद्धाच्या मैदानात चीनच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात, अजून एकही क्षेपणास्त्र डागले गेले नव्हते आणि ऑपरेशन एपिक फ्युरी या मोहिमेचे नावही लोकांसमोर आले नव्हते. त्याच काळात काही उच्च दर्जाची (हाय-रिझोल्यूशन) सॅटेलाइट फोटो इंटरनेटवर फिरू लागली. या फोटोंमध्ये रनवेवर उभे असलेले लढाऊ विमाने, वाळवंटी विमानतळांवर उतरणारी ट्रान्सपोर्ट विमाने आणि भूमध्य समुद्रात तैनात असलेल्या विमानवाहू नौकांवरील लढाऊ विमाने स्पष्टपणे दिसत होती. विशेष म्हणजे यात विमानांचे प्रकार, मिसाइल संरक्षण प्रणाली आणि सैनिकांची अचूक तैनाती ‘जिओलोकेशन’सह दाखवण्यात आली होती.

व्हायरल झालेल्या एका चित्रात अमेरिकेचे लढाऊ विमान इस्रायलमधील हवाई तळावर उभे असल्याचे दिसत होते. तर दुसऱ्या चित्रात सौदी अरेबियातील प्रिन्स सुलतान एअर बेस येथे वाढलेली लष्करी तैनाती आणि सहाय्यक यंत्रणा स्पष्ट दिसत होती. याशिवाय कतार, जॉर्डन आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांचेही नकाशे या फोटोंमध्ये दाखवण्यात आले होते. हे सॅटेलाइट फोटो चीनमधील मिझारव्हिजन या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) कंपनीने ऑनलाइन प्रसिद्ध केल्याचे समोर आले आहे. शांघायस्थित या कंपनीत 200 पेक्षाही कमी कर्मचारी काम करतात.

२० फेब्रुवारीच्या सुमारास कंपनीने उच्च दर्जाच्या सॅटेलाइट चित्रांचा एक संच प्रकाशित केला होता. त्यानंतर १ मार्चपर्यंत जॉर्डन, कुवैत, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीतील लष्करी ठिकाणांची आणखी फोटो प्रसिद्ध करण्यात आले. ‘जिओलोकेशन’सह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (Twitter) आणि चीनमधील Weibo या नेटवर्कवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आली. काही पोस्ट्स चीनी सरकारी माध्यमांशी संबंधित खात्यांनी तसेच चीनी लष्कराशी संबंधित विश्लेषकांनीही पुढे शेअर केल्या.

हे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांतच २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केले. हा मोठा हवाई हल्ल्यांचा लष्करी अभियान होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. या घडामोडींनंतर या सॅटेलाइट चित्रांबद्दलची चर्चा आणखी वाढली. अनेक तज्ज्ञांच्या मते, आधुनिक युद्धात केवळ शस्त्रेच नव्हे तर डेटा, सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ताही मोठी भूमिका बजावत आहेत.

Comments are closed.