Iran Warning To US – इराण कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेला कठोर इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर त्यांनी सर्वच देशांवर 15 टक्के टॅरिफ लादला आहे. अमेरिकेत हा तणाव वाढत असतानाच आता आखाती देशातही तणाव वाढत आहे. अण्वस्त्रंबदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिका इराणवर दबाव टाकत आहेत. एकीकडे वाटाघाटी सुरू असून अमेरिकेने आखाती देशाकडे विमानवाहू युद्धनौका पाठवत युद्धसज्जता असल्याचे दाखवून दिले आहे. तर आम्ही कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असा कठोर इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे.
अमेरका-इराण तणाव वाढत असताना इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकेला सज्जड दम दिला आहे. इराण अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आखाती देशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेझेश्कियान यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिकेने विमानवाहू जहाज पाठवून मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवली आहे. अशावेळी पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे ठणकावले की, आम्ही या कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे झुकणार नाही. जगातील काही देश आम्हाला शरण येण्यास भाग पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्ही अमेरिका किंवा कोणत्याही देशाच्या दबावासमोर झुकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.