आखाती युद्धात पाकिस्तानची उडी; इस्रायलला धमकी! कतार समजू नका, चांगलीच अद्दल घडवू!!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एकीकडे पाकिस्तान मध्यस्थी करत असल्याच्या चर्चा सुरू असतानाच इराणची राजधानी तेहरानमध्ये इस्रायलने पाकिस्तानच्या दूतावासाजवळ हल्ले केले. यामुळे पाकिस्तान संतापला असून, आम्ही कतार नाही. आमच्या अधिकारी आणि मुत्सद्यांना कोणतेही नुकसान झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पाकिस्तानने इस्रायलला दिला.

इस्रायलने तेहरानमध्ये काही ठिकाणी हवाई हल्ले केले. हे हल्ले पाकिस्तानी दूतावास आणि राजदूतांच्या निवासस्थानाजवळ करण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानने इस्रायलला इशारा दिला आहे. पाकिस्तान सरकारशी संलग्नित संस्था ‘पाकिस्तान स्ट्रटेजिक फोनम’ने एका निवेदनातून इस्रायलला म्हटले की, पाकिस्तान हे कतर नाही हे इस्रायलने स्मरणात ठेवले पाहिजे. जगभरात कुठेही पाकिस्तानी अधिकारी किंवा मुत्सद्यांना हानी पोहोचवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील.

‘धन्यवाद हिंदुस्थान!’ लिहून इराणने इस्रायलवर डागली क्षेपणास्त्र

इराणने इस्रायलवर आज क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यावर ‘धन्यवाद हिंदुस्थान’ असे लिहिले होते. हिंदुस्थानव्यतिरिक्त स्पेन, पाकिस्तान आणि जर्मनीसाठीदेखील क्षेपणास्त्रांवर संदेश लिहिले होते.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मुदतवाढ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेली मुदत 6 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, की इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याची योजना तात्पुरती थांबवली आहे. यासाठी इराणच्या सरकारने विनंती केली होती, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे. ट्रम्प यांचे प्रस्ताव एकतर्फी असल्याची टीका इराणने केली आहे.

चार एलपीजीवाहू जहाजे हिंदुस्थानात दाखल

देशात एलपीजी टंचाई असताना एक दिलासादायक बातमी आहे. होर्मुझची सामुद्रधुनी पार करुन एलपीजीने भरलेली चार जहाजे हिंदुस्थानच्या बंदरांवर दाखल झालेली आहेत. त्यामुळे एलपीजी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत चिनी जहाजे थांबली

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन जहाजांना माघारी पाठवले. त्यात चीनच्या एका जहाजाचा समावेश होता. ही जहाजे वेगवेगळ्या देशांची होती आणि त्यांना इशारा दिल्यानंतर पुढे जाण्यापासून रोखण्यात आले, असे इराणच्या सैन्याने सांगितले. अमेरिका व मित्रराष्ट्रांच्या जहाजांसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

इराणच्या अणुऊर्जा पेंद्रावर इस्रायलचा हल्ला

इस्रायलने आज इराणच्या अणुऊर्जा  केंद्रावर भीषण हल्ला केला. मध्य इराणमधील खोंदाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्सवर अमेरिका आणि इस्रायलने दोन टप्प्यांमध्ये हल्ले केले. हेवी वॉटर आणि यलोकेक उत्पादन पेंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.

Comments are closed.