इराणचे गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब यांचा मृत्यू, इस्रायली संरक्षण दलाकडून मारले गेल्याचा दावा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेतील युद्ध आता आणखी धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. इस्रायलने एक मोठा दावा करत जगाला हादरवून सोडलं आहे. इस्रायलचे संरक्षणमंत्री इजराइल कार्टज् यांनी सांगितलं की, इराणचे गुप्तचर मंत्री इस्माइल खतिब यांचा हवाई हल्ल्यात खात्मा करण्यात आला आहे. हा हल्ला रात्रीच्या अंधारात करण्यात आला होता. इस्रायलचा दावा आहे की, त्यांनी थेट इराणच्या सत्ताकेंद्रावर प्रहार केला.

मात्र, इराणकडून अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. गेल्या काही दिवसांत इराणला सलग मोठे धक्के बसले आहेत. अली लारीजानी यांच्या मृत्यूनंतर आता गुप्तचर मंत्री खतीब यांचा मृत्यू झालेला आहे. केवळ दोन दिवसांमध्ये दोन महत्त्वाच्या नेत्यांचा मृत्यू झालेला आहे. आमच्या निशाण्यावर असलेल्या कोणत्याही इराणी अधिकाऱ्याला मारण्यासाठी सैन्याला मोकळीक दिली आहे, असा इस्त्रायलने आता इशारा दिला आहे. हा इशारा म्हणजे युद्ध आणखी तीव्र होण्याचे संकेत मानले जात आहेत.

इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने यापूर्वीच पुष्टी केली होती की, त्यांचे सचिव अली लारीजानी हे इस्रायली हल्ल्यात ठार झाले. इराणच्या तस्निम वृत्तसंस्थेनुसार, परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे की, लारीजानी यांचा मंगळवारी सकाळी (१७ मार्च, २०२६) मृत्यू झाला. त्यांचे पुत्र मोर्तेझा लारीजानी, परिषदेच्या सचिवालयातील सुरक्षा विभागाचे उपप्रमुख अलीरेझा बायात आणि इतर अनेक जणही ठार झाले.

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले की, इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायली संरक्षण दलाने (IDF) लारीजानी यांना ठार केले. दरम्यान, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) मंगळवारी पुष्टी केली की, बसिज स्वयंसेवक दलाचे प्रमुख गुलामरेझा सोलेमानी हे अमेरिका-इस्रायली हल्ल्यात ठार झाले.

Comments are closed.