मृत्यूनंतर चार महिन्यांनी खामेनींचा अंत्यसंस्कार, 21 जून रोजी इराणच्या मशहद शहरात होणार दफन
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर चार महिन्यांनी त्यांचे दफन केले जाणार आहे. येत्या 21 जून रोजी खामेनी यांच्या अंतिम इच्छेनुसार, मशहद शहरात शिया इस्लामचे प्रसिद्ध इमाम रजा यांच्या दर्ग्याजवळ दफन होणार आहे.
तेहरानमध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात 28 फेब्रुवारीला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा शासकीय इतमामातील अंत्यसंस्कार 4 मार्च रोजी नियोजित होता. मात्र तो पुढे ढकलण्यात आला. खामेनींच्या अंत्यविधीला अभूतपूर्व गर्दी होण्याची शक्यता आहे. सुमारे दोन कोटी नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
अभूतपूर्व गर्दीची शक्यता
खामेनी यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम तीन दिवस चालण्याची शक्यता आहे. अंत्ययात्रा संपन्न झाल्यानंतर मशहद शहरातील इमाम रझा यांच्या दर्ग्याजवळ खामेनी यांचा दफनविधी पार पडेल. धार्मिक महत्त्व असणाऱ्या कोम आणि मशहद शहरातून खामेनींची अंत्ययात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्सने दिली.
Comments are closed.