इरफान पठाणचा थेट वार! पाकिस्तानची लायकी काढत म्हणाला, ‘फक्त दुबळ्या संघांसमोर तुमचा वाघ…
इरफान पठाण पाकिस्तान संघ टी२० विश्वचषक २०२६ : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये नामिबियाविरुद्ध दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानने सुपर-8 फेरीत प्रवेश केला आहे. मात्र या विजयानंतर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठान यांच्या एका वक्तव्याने सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे.
𝐒𝐮𝐩𝐞𝐫 𝟖 𝐥𝐨𝐜𝐤𝐞𝐝 🔒
पाकिस्तानच्या विजयामुळे आठ संघांनी पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला आहे #T20WorldCup. तपशील ⬇️https://t.co/1ljtP4r41L
— ICC (@ICC) 18 फेब्रुवारी 2026
नामिबियावर मोठा विजय, पण वक्तव्यामुळे खळबळ
पाकिस्तानने नामिबियाविरुद्ध सर्वच विभागांत दमदार कामगिरी करत तब्बल 102 धावांनी सामना जिंकला. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी वर्चस्व गाजवले. या विजयाच्या जोरावर पाकिस्तानने सुपर-8 साठी पात्रताही मिळवली.
सामन्यानंतर समालोचनादरम्यान इरफान पठान म्हणाला की, “दुबळ्या संघांसमोर आणि खालच्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध पाकिस्तान संघ हा खूप मजबूत वाघ दिसतो.” त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी पाकिस्तानच्या कामगिरीवर टोमणा म्हणून अर्थ लावला आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण आले आहे.
मोठ्या संघांसमोर का ढेपाळतो पाकिस्तान?
या स्पर्धेत पाकिस्तानने नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया यांसारख्या संघांविरुद्ध विजय मिळवला. मात्र भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांना एकतर्फी पराभव पत्करावा लागला. यामुळेच त्यांच्या सातत्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लहान संघांविरुद्ध आक्रमक आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ दाखवणारा पाकिस्तान, बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांसमोर मात्र अनेकदा लय गमावताना दिसतो. दबावाच्या क्षणी निर्णयक्षमता आणि सातत्य या बाबतीत संघ कमी पडतो, अशी टीका वारंवार होत असते.
सुपर-8 मध्ये खऱ्या अर्थाने आव्हान
आता सुपर-8 फेरीत पाकिस्तानसमोर खऱ्या अर्थाने आव्हान उभे राहणार आहे. या टप्प्यात त्यांचा सामना न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका यांसारख्या मजबूत संघांशी होणार आहे. मोठ्या सामन्यांचा दबाव झेलण्याची आणि सामना पलटवण्याची क्षमता या तिन्ही संघांकडे आहे. 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या सुपर-8 फेरीत पाकिस्तानचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. त्यामुळे आता उत्सुकता आहे, ती याचीच लहान संघांविरुद्ध जशी चमक दाखवली, तशीच कामगिरी पाकिस्तान बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांसमोरही करू शकतो का?
येथे सुपर 8️⃣ सादर करत आहे #T20WorldCup 2026 👊
पात्रतेबद्दल अधिक ➡️ https://t.co/lRFALG1p5d pic.twitter.com/bMUwhUps7f
— ICC (@ICC) 18 फेब्रुवारी 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.