पाकिस्तानच्या साहिबजादाकडून गोळीबाराची ॲक्शन; Live कॉमेंट्रीमध्ये इरफान पठाण म्हणाला, आता…

आयएनडी वि पाक एशिया कप 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील (Asia Cup 2025) सुपर-4 मध्ये भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने 6 विकेट्स पाकिस्तानचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकती देखील दिसल्या.

पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक झळकावताच बॅटनं AK 47 प्रमाणे गोळीबाराची ॲक्शन केली. साहिबजादा फरहानचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर भारतीयांकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येतोय. दरम्यान, सामना सुरु असताना ज्यावेळी साहिबजादा फरहानने गोळीबाराची ॲक्शन केली, त्यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि समालोचक इरफान पठाणचं (Irfan Pathan) विधान देखील समोर आलं आहे. साहिबजादा फरहानने गोळीबाराची ॲक्शन केली, त्यावेळी इरफान पठाण कॉमेंट्री करत होता. साहिबजादा फरहानच्या या कृत्यावर आता भारताची देखील फलंदाजी अद्याप बाकी आहे. ते देखील येतील…भारतीय फलंदाज देखील सेलिब्रेशन करतील, असं इरफान पठाण म्हणाला.

अभिषेक शर्माची आक्रमक फलंदाजी-

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. अभिषेकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत दमदार सुरुवात केली. चारही बाजूंनी चौकार-षटकारांचा वर्षाव होत होता. नवव्या षटकातच भारताने शतक गाठलं. अभिषेक शर्मानं फक्त 24 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात अभिषेक शर्माने 39 चेंडूत 74 धावा केल्या. यामध्ये 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश आहे.

भारत-पाकिस्तानचा सामना कसा राहिला?

पाकिस्ताननं भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर भारतानं हे आव्हान आरामात पार केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. तर शुभमन गिलनं 47 धावांचं योगदान दिलं. या दोघांनी 105 धावांची सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मानं विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दरम्यान, पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या. तर फखर जमानने 15, सईम अयुबने 21, मोहम्मद नवाजने 21, सलमान आगाने 17 आणि फहीम अश्रफने 20 धावा केल्या. भारताकडून शिवम दुबेने 2 विकेट्स पटकावल्या. तर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादवला प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाल्या.

संबंधित बातमी:

इंडियन वि पॅक असिया कप आता हॅरिस रौतेनीही दिव्चलान, मला जमिनीवर माहित नाही, जमिनीत गाठ,

Ind vs Pak Asia Cup 2025: चल जा भोसxx..अभिषेक अन् शुभमन दोघेही नडले; शाहीन, हारीसला बोल बोल बोलले, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.