बहुचर्चित विकी कौशलच्या ‘छावा’चा सिक्वेल येणार?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सध्या पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये विकी कौशल आणि लक्ष्मण उतेकर या जोडीची जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. आगामी छावाच्या सिक्वेलमुळे ही चर्चा आता सुरु झाली आहे. छावा ला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर या चित्रपटाचा सिक्वेल येणार असे म्हटले जाते आहे. छावाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत अनेकांना धोबीपछाड दिला होता. छावाने तब्बल ८०७ कोटी रुपयांची कमाई केली होती. म्हणूनच निर्मात आता पुन्हा या चित्रपटाचा विचार करत आहे. हा पुढचा प्रवास पुन्हा एकदा मराठा साम्राज्यावरच आधारीत असणार आहे.

ई-टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुढचा चित्रपट संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्या जीवन संघर्षावर आधारित असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकी कौशलने कथेत खूप रस दाखवला आहे आणि उतेकर यांच्या दिग्दर्शनाखाली पुन्हा एकदा काम करण्यास तो उत्सुक आहे. सध्या, हा प्रकल्प त्याच्या प्राथमिक नियोजनाच्या टप्प्यात आहे आणि सर्व काही सुरळीत पार पडल्यास, चित्रीकरण पुढील वर्षी किंवा २०२८ च्या सुरुवातीला सुरू होऊ शकते.

सध्याच्या घडीला विकी आणि लक्ष्मण उतेकर दोघेही त्याच्या जुन्या प्रकल्पांमध्ये व्यस्त आहेत. लक्ष्मण उतेकर सध्या श्रद्धा कपूर अभिनीत ‘ईठा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट पूर्ण झाल्यावरच ते शाहू महाराज यांच्यावरील चित्रपटाचे काम सुरू करतील. दुसरीकडे, विकी कौशलसुद्धा खूप व्यस्त आहे. तो सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’चे चित्रीकरण करत आहे आणि त्यानंतर लवकरच तो भगवान परशुरामांवर आधारित ‘महावतार’ या भव्यदिव्य चित्रपटाची तयारी करण्यात व्यस्त आहे. या नवीन बायोपिकबाबत विकी किंवा उतेकर या दोघांकडूनही अद्याप कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. त्यामुळेच आता शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या बातमीने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

Comments are closed.