IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडेमध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? जाणून घ्या आकडे काय सांगतात
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) चालू असलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत निराशाजनक खेळ केला आहे. कोलकात्यात झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाला (Team india) 30 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या कसोटीमध्येही भारताची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका खेळली जाणार असून तिची सुरुवात 30 नोव्हेंबरपासून होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा वनडेमधील रेकॉर्ड कसा आहे?
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेत भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही. या फॉरमॅटमध्ये दक्षिण आफ्रिका भारतापेक्षा आघाडीवर आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये 94 सामने खेळले गेले आहेत. यापैकी दक्षिण आफ्रिकेने 51 सामने जिंकले आहेत, तर भारताने 40 सामने जिंकले आहेत. 3 सामने रद्द झाले आहेत. आकडेवारीनुसार दक्षिण आफ्रिका स्पष्टपणे पुढे आहे.
टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे तर यात भारत खूप पुढे आहे आणि दक्षिण आफ्रिका मागे आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये 31 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर दक्षिण आफ्रिकेने 12 विजय मिळवले आहेत. 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होईल. दुसरा सामना 3 डिसेंबरला रायपूरमध्ये खेळला जाईल आणि तिसरा सामना 6 डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे रंगणार आहे.
Comments are closed.