ईशान किशन लवकरच चढणार बोहल्यावर?आजोबांच्या प्रश्नावर ईशानने दिलेलं ‘ते’ उत्तर सोशल मीडियावर व्हायरल!

आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप 2026 (Icc T20 international world cup 2026) मध्ये भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ईशान किशन (Ishaan kishan) सध्या जबरदस्त चर्चेत आहे. विशेष म्हणजे, यावेळी तो केवळ त्याच्या खेळासाठी नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने 96 धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यात ईशानने अवघ्या 25 चेंडूत 54 धावांची तुफानी खेळी केली होती. विजयानंतर नरेंद्र मोदी स्टेडियमवर ईशानने त्याची मैत्रीण (गर्लफ्रेंड) अदिती हुंडिया हिला मिठी मारून सेलिब्रेशन केले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, ईशानचे आजोबा रामानुग्रह पांडे यांनी त्याच्या लग्नाबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. आजोबांनी जेव्हा ईशानला विचारले, “तुझ्या लग्नापर्यंत मी जिवंत राहीन का?”, तेव्हा ईशान हसून म्हणाला, आजोबा, माझे लग्न तर पुढच्याच वर्षी होणार आहे. तुम्हाला माझ्या मुलाच्या जन्मापर्यंत राहावे लागेल, तुम्ही त्याला आपल्या मांडीवर खेळवाल. ईशानच्या आजोबांनी पुढे असेही म्हटले की, ईशान ज्याच्यासोबत आनंदी असेल, तिला स्वीकारायला आमची पूर्ण तयारी आहे.
ईशान किशनची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया ही ग्लॅमर जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. ती ‘मिस डीवा 2018’ ची विजेती आहे. तसेच ती ‘फेमिना मिस इंडिया’ ची फायनलिस्ट आणि नॅशनल ब्युटी क्वीन कॉन्टेस्टपर्यंत पोहोचली आहे. अदिती आणि ईशान 2019 च्या आयपीएलपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यावेळी अदिती स्टँड्समध्ये ‘मिस्ट्री फॅनगर्ल’ म्हणून चर्चेत आली होती. अदितीचे वडील जयपूरमध्ये तुपाचे मोठे व्यापारी आहेत. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून प्रत्येक सामन्यात ईशानला पाठिंबा देताना दिसते. फायनल सामन्यापूर्वी ती भारतीय संघासोबत डिनरलाही गेली होती.
Comments are closed.