Weight Loss : वेट लॉससाठी पोहा की उपमा खाणे फायदेशीर?

सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करावी, असे डॉक्टर सांगतात. भारतीयांच्या सकाळच्या नाश्त्यात शक्यतो कांदा-पोहे, वडा, उपमा, इडली यांसारखे पदार्थ बनवले जातात आणि आवडीने खाल्लेही जातात. त्यातही पोहे आणि उपमा जवळजवळ प्रत्येक घरात बनवले जातात. हे दोन्ही पदार्थ बनवायला जितके सोपे आहेत तितकेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पोहे आणि उपमा या दोन्ही पदार्थात फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे पोट जास्त वेळ दिर्घकाळ भरलेले राहते. पण, जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा अनेकजणांना असा प्रश्न सतावतो की, वेट लॉससाठी पोहे की उपमा खाणे फायदेशीर असते? चला तर मग आजच्या लेखातून जाणून घेऊयात वेट लॉससाठी पोहा की उपमा खाणे फायदेशीर?

पोहेची उपमा?

पोहे आणि उपमा हे दोन्ही पदार्थ अत्यंत चविष्ट पदार्थ आहेत. पण, जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अनेकांना पोहे आणि उपम्यामध्ये कन्फ्युजन होते. काहींना वाटते पोहे अधिक हलके आणि पौष्टिक असतात तर काहींना असे वाटते की, उपमा योग्य वाटतो.

वेट लॉससाठी पोहे खाण्याचे फायदे –

  • पोहे आरोग्यादायी नाश्ता आहे.
  • पोहे फायबरयुक्त असल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे तुम्ही कमी खाता आणि वजन कमी करणे सोपे जाते.

  • दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी पोहे हा उत्तम नाश्ता आहे.
  • पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी पोहे उपयुक्त मानले जातात, कारण यामुळे चयापचय क्रियेला गती मिळते.

वेट लॉससाठी उपमा खाण्याचे फायदे –

  • उपम्यामध्ये फायबर भरपुर प्रमाणात असतात. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते.
  • रव्यातील पोषणमूल्यांमुळे पचनक्रिया सुधारते.

  • उपम्यात विविध भाज्या वापरल्या जातात. या भाज्यांमधून शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ऍटी-ऑक्सिडंट्स मिळतात.

व्हॅट लॉस पोहेची उपमा?

तुम्ही नाश्त्यात पोहे आणि उपमा दोन्ही पदार्थ खाऊ शकता. पण, वेट लॉससाठी उपम्यापेक्षा पोहे खाणे अत्यंत फायद्याचे ठरेल. पोह्यात कमी कॅलरीज असतात, जे चरबी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वेट लॉससाठी फायद्याचे ठरतात.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=cspx349j-wc

Comments are closed.