मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त? सरावादरम्यान गुडघ्याला बांधली पट्टी; पाहा VIDEO

आगामी भारत विरुद्ध इंग्लंड 5 सामन्यांच्या टी20 मालिकेला 22 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू सरावासाठी जमले आहेत. या दरम्यान सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर होत्या. जो 14 महिन्यांनंतर संघात परतत आहे. शमीने भारतासाठी शेवटचा सामना 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळला. संघात परतल्यानंतर, शमीने एका तासापेक्षा जास्त वेळ पूर्ण लयीत गोलंदाजी केली.

डाव्या गुडघ्याला जोरदार पट्टी बांधलेली असली तरी, गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्न मॉर्केल यांच्या देखरेखीखाली शमीने सुरुवातीला शॉर्ट रन-अपसह हळू गोलंदाजी केली आणि नंतर पूर्ण रन-अपसह त्याचा वेग वाढवला. बऱ्याच काळानंतर परतणाऱ्या शमीच्या फिटनेसबद्दल शंका होत्या. पण सरवात त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीने आणि अचूक लाईन लेंथने अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा सारख्या युवा फलंदाजांना त्रास देऊन सर्व चिंता दूर केल्या.

संपूर्ण सरावसत्रात शमीला थोडासा अस्वस्थ वाटण्याचा एकमेव क्षण होता जेव्हा तो लंगडत चेंजिंग रूममध्ये परतला, पण तो लगेच मैदानात परतला. यानंतर त्याने गुडघ्यावर पट्टी बांधून सराव केला.

19 फेब्रुवारीपासून दुबई आणि पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघाची वेगवान गोलंदाजी युनीट मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याने शमीचा इंग्लंडविरुद्धच्या टी20 संघात समावेश हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबतची परिस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघासाठी शमीची तंदुरुस्ती महत्त्वाची आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधून पुनरागमन केल्यानंतर शमीने राष्ट्रीय संघात स्थान मिळवले आहे. त्याने रणजी ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी आणि त्यानंतर विजय हजारे एकदिवसीय ट्रॉफीमध्येही भाग घेतला होता.

हेही वाचा-

‘आम्ही आमचे सर्वोतपरी…’, कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!
IPL 2025: LSG लवकरच जाहीर करणार आपला कर्णधार, स्टार खेळाडूचे नाव शर्यतीत सर्वात पुढे
महिलांनंतर, पुरुष संघही विश्वविजेता, पहिल्या खो-खो वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं

Comments are closed.