रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार? समोर आली मोठी अपडेट
आयपीएल 2026 चा बिगुल वाजला आहे. सर्व संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा मुंबईचा निरोप घेऊन कोलकाता नाईट रायडर्समध्ये सामील होऊ शकतो, अशी चर्चा आहे. (Rohit Sharma might leave Mumbai and join Kolkata Knight Riders)
अलीकडेच रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले होते.
आयपीएल 2024 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहितला कर्णधारपदावरून हटवले होते. त्यानंतर त्याने 2024 आणि 2025 हंगामात खेळाडू म्हणून सहभाग घेतला होता. (After that, he participated as a player in the 2024 and 2025 seasons)
आता अभिषेक नायर केकेआरचा मुख्य प्रशिक्षक होणार असल्याने, रोहित शर्मा देखील केकेआरचा भाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी मोठे उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. (Therefore, signs of major upheaval before the upcoming season are evident)
Comments are closed.