हिटमॅनच्या भविष्यावर प्रशिक्षकांचे मोठे वक्तव्य, वनडे निवृत्तीबाबत नेमकं काय म्हणाले?
ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या अगोदरच रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कर्णधारपद काढून घेतलं गेलं. त्यानंतर पर्थमध्ये त्याचा खेळ निराशाजनक ठरल्याने संघात त्याच्या जागेबाबतही प्रश्न निर्माण झाले. पण, ॲडिलेडमध्ये हिटमॅनने जबरदस्त पुनरागमन करत 73 धावांची खेळी केली. त्यानंतर सिडनी वनडेत नाबाद 121 धावा ठोकून 38 व्या वर्षीही संघातील आपली जागा अधिक बळकट केली.
रोहितच्या या तुफानी पुनरागमनानंतर त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Laad) खूप आनंदी झाले. त्यांनी रोहितच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.
सिडनी वनडेनंतर पुन्हा एकदा रोहित शर्मा आपल्या भविष्याबाबत चर्चेत आला आहे. त्याबद्दल आता स्वतः त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भाष्य केले आहे.
पीटीआयशी बोलताना लाड म्हणाले,
हा खूप खास क्षण आहे. काही दिवसांपूर्वी लोक म्हणत होते की रोहित आता चांगला खेळत नाही, त्याने क्रिकेट सोडावं. पण गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट खेळ केला. पहिल्या सामन्यात 73 आणि नंतर सिडनीत 121 नाबाद धावा करून दाखवलं की तो अजूनही देशासाठी योगदान देऊ शकतो.
त्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे आत्मविश्वास. म्हणूनच त्याने अजून निवृत्ती घेतलेली नाही. तो 2027 चा विश्वचषक खेळू इच्छितो आणि त्यासाठीच तयारी करत आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा चालू असतात. त्यावर दिनेश लाड म्हणाले,विराटबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलल्या गेल्या, पण मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की तो पुन्हा चांगला खेळेल आणि तसेच झाले.
दोघांनीही उत्तम कामगिरी केली आहे. मला त्या दोघांनाही 2027 चा विश्वचषक खेळताना बघायचे आहेत. अनेकांनी म्हटलं की, रोहित आणि विराट यांच्यात मतभेद आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. ते दोघेही जवळचे मित्र आहेत आणि देशासाठी मनापासून खेळतात. जर त्यांच्यात मतभेद असते, तर अशी अप्रतिम भागीदारी आणि देशासाठीचा हा मोठा विजय नक्कीच झाली नसता.
Comments are closed.