Asia Cup: आशिया कपपूर्वी टीम इंडियाच्या 3 कमकुवत बाजू समोर! गंभीर- सूर्यकुमार यांच्यापुढे अडचण निर्माण?
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे.
स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाकडे (Team india) काही कमजोरी आहेत. जर आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा (Abhishek Sharma & Shubman gill) आणि शुबमन गिल सलामीला खेळले, तर संजू सॅमसनला मधल्या फळीत फलंदाजी करावी लागेल. मात्र, मधल्या फळीत संजूचे (Sanju Samson) प्रदर्शन चांगले नाही. त्याने मधल्या फळीत 5 सामने खेळून फक्त 65 धावा केल्या आहेत.
तसेच, लोअर मिडिल ऑर्डरमध्ये खेळणारा रिंकू सिंग (Rinku Singh) हा फलंदाजीबरोबर गोलंदाजी करत नाही, जे टीम इंडियासाठी आणखी एक आव्हान ठरू शकते.
Comments are closed.