स्टीव स्मिथनंतर केन विलियमसनही क्रिकेटमधून निवृत्ती घेणार ? अफवा की वास्तव जाणून घ्या एका क्लिकवर

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघाकडून चार विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याने वनडे क्रिकेट मधून निवृत्ती घेऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले. तसेच आताच्या टी20 आणि कसोटी सामन्यासाठी तो उपलब्ध असेल. त्यानंतर ह्या चर्चांना उधाण आलं आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर केन विलियमसन (kane Williamson) निवृत्तीची घोषणा करू शकतो. 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) संघात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्या सामन्या आधी जाणून घ्या की खरंच केन विलियमसन निवृत्ती घेणार आहे का?

जेव्हापासून भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम सामन्यासाठी पात्र झाले आहेत तेव्हापासून सोशल मीडियावर दावा केला जात आहे की अंतिम सामन्यानंतर केन विलियमसन निवृत्त होईल. एका चाहत्याने दावा केला आहे की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार. त्यानंतर केन विलियमसन वनडे क्रिकेट मधून त्याच्या निवृत्तीची घोषणा करेल आणि या दोन्ही गोष्टी 9 मार्च रोजी होणार आहेत. तेव्हा कोणीतरी प्रश्न विचारला की विलियमसन खरंच निवृत्त होणार आहे का?

केन बद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जात आहे . केन विलियमसनने त्याच्या निवृत्तीवर अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच न्यूझीलंडनेही कोणतंही स्टेटमेंट दिलं नाही. स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास केन विलियमसनच्या निवृत्तीच्या गोष्टी खोट्या आहेत. केन निवृत्ती घेणार की नाही हे तोच ठरवेल. केन विलियमसनचं आतापर्यंतचं वनडे करिअर पाहिल्यास त्याने 172 सामन्यात 7224 धावा केल्या आहेत. तसेच त्यामध्ये त्याने 15 शतक आणि 47 अर्धशतके ठोकली आहेत.

हेही वाचा

विनेश फोगाटने दिली गुड न्यूज, लवकरच आई होणार!

शोएब अख्तर यांचा थेट कार्यक्रमात राग अनावर, माजी क्रिकेटपटू आश्चर्यचकित

विराट कोहली सचिनच्या पावलावर! आतापर्यंत खेळले इतके ICC वनडे फायनल्स

Comments are closed.