भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता पद होणार रिकामे? अजित अगरकरांच्या नोकरीवर मोठी अपडेट

अजित आगरकर: भारतीय क्रिकेट सध्या बदलाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यातून जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन या 3 दिग्गज खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजानेही टी20 फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ एक नवी सुरुवात करणार आहे. या बदलाच्या टप्प्यात संघ व्यवस्थापन आणि निवड समिती खूप मोठी भूमिका बजावत आहेत. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Ajit Agarkar Chief Selector)

क्रिकब्लॉगरच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, “अजित अगरकर मुख्य निवडकर्ता पदावर कायम राहू शकतात. त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो, परंतु बोर्ड याची पुष्टी करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे पालन करेल.” (BCCI Chief Selector)

अजित अगरकर यांची जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता म्हणून निवड झाली होती, त्यानंतर त्यांनी चांगले काम केले. त्यांच्या मुख्य निवडकर्तापदाच्या काळात भारतीय संघाने 2024चा टी20 विश्वचषक आणि 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. याच काळात भारतीय संघाने 2023च्या वनडे विश्वचषकाचा फायनल सामनाही खेळला होता. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी अनेक विषयांवर भारतीय संघ व्यवस्थापनाच्या विरोधात असहमती दर्शवली आहे आणि रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी निवृत्तीमध्ये त्यांचाच हात होता, असा दावाही करण्यात आला आहे. (Ajit Agarkar as the chief selector of Team India)

भारतीय संघाला 20 जूनपासून इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. दरम्यान, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर त्यांच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याने ते भारतात परतले होते. आता असे सांगितले जात आहे की त्यांच्या आईच्या तब्येतीत सुधारणा झाली आहे आणि ते (17 जून) रोजी पुन्हा भारतीय संघात सामील होणार आहेत. (Gautam Gambhir Coach)

Comments are closed.