शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नात भ्रष्टाचार होतोय का? सुप्रिया सुळे यांचा सवाल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रस्ते, शिक्षण, आश्रमशाळा आणि अंगणवाडी अशा कोणत्याही क्षेत्रात अपेक्षित गुणवत्ता दिसून येत नाही. यासाठी एवढा मोठा निधी मंजूर केला जात असेल, तर मग हा निधी जातो कुठे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या अन्नात भ्रष्टाचार होतोय का, असा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्ते, शिक्षण, आश्रमशाळा, अंगणवाडी, कशातच गुणवत्ता दिसून येत नाही. जर शिक्षणासाठी एवढा मोठा निधी मंजूर केला जात असेल, तर मग हा निधी जातो कुठे? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या संघटनेचा एखादा कार्यक्रम घ्यायला ते पुण्यात येत असतील, तर एवढ्या अटी-शर्ती कशाला? ते येणार, लोकशाहीच्या मार्गाने शांततेत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आणि निघून जाणार. त्यात गैर काय ? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आमची ही लढाई ज्याचा पक्ष आहे, त्याला तो मिळाला पाहिजे यासाठी आहे. त्यानंतर पवार साहेबांनी त्या पक्षाचं काय करायचं, हा निर्णय स्वतः पवार साहेबांचा आणि त्या प्रक्रियेमध्ये असणाऱ्या लोकांचा असेल. हा आमचा कोणाचा वैयक्तिक प्रश्न नाही, कारण संघटना ही कुणाची मालकी नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Comments are closed.