Met Gala 2026 – सोन्याच्या धाग्यांनी विणलेली साडी अन् 1800 कॅरेटचा हिऱ्यांचा ब्लाऊज, मेट गालात ईशा अंबानींचा ‘रॉयल’ थाट!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उद्योजक मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित ‘मेट गाला 2026’ च्या रेड कार्पेटवरील तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. यंदा तिने प्रसिद्ध हिंदुस्थानी फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केलेली विशेष साडी परिधान केली होती. या साडीच्या माध्यमातून हिंदुस्थानी कला, संस्कृती आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम जागतिक व्यासपीठावर पाहायला मिळाला. ईशा अंबानींच्या या लूकने मेट गालामध्ये हिंदुस्थानची छाप पुन्हा एकदा ठळकपणे उमटवली आहे.

ईशा अंबानीने या सोहळ्यासाठी नेसलेली साडी रिलायन्स रिटेलच्या ‘स्वदेश’ ब्रँडच्या कारागिरांनी शुद्ध सोन्याच्या धाग्यांनी विणली आहे. साडीप्रमाणेच तिच्या ब्लाऊजचीही सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. हा ब्लाऊज खऱ्या हिऱ्यांनी मढवलेला असून, त्यामध्ये 1800  कॅरेटहून अधिक हिरे, पाचू, कुंदन आणि पोलकी जडवण्यात आली आहेत, अशी माहिती स्वतः ईशाने दिली. तसेच तिने सुबोध गुप्ताने तयार केलेला मँगो स्कल्पचरही कॅरी केला आहे.

या साडीसोबत ईशाने अत्यंत निवडक आणि राजेशाही दागिने परिधान केले होते, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ईशाने हिंदुस्थानी वारसा आणि जागतिक फॅशन यांचा उत्तम समतोल राखला आहे. मेट गालाच्या रेड कार्पेटवर दरवेळी काहीतरी नावीन्यपूर्ण सादर करण्याच्या तिच्या या प्रयत्नाचे फॅशन विश्वातून भरभरून कौतुक होत आहे. सध्या सोशल मीडियावर ईशा अंबानींच्या या लूकचे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.

Comments are closed.