RCB vs SRH: ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम! RCB विरुद्ध मैदानात उतरताच रचला इतिहास; विराट कोहलीच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

ईशान किशन (Ishaan kishan) आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाचे नेतृत्व करत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध खेळला जात आहे. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) अनुपस्थितीत ईशान किशन या फ्रँचायझीची धुरा सांभाळत आहे. फिटनेसच्या समस्यांमुळे पॅट कमिन्स या हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही.

शनिवारी आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात कर्णधारपद भूषवून ईशान किशनने इतिहास रचला असून तो विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका खास पंगतीत स्थान मिळवले आहे.

अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केल्यानंतर आयपीएलमध्येही कोणत्याही संघाचे कर्णधारपद भूषवणारा ईशान किशन हा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहली हा असा पहिला क्रिकेटपटू होता, ज्याने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्यानंतर तो आयपीएल संघाचाही कर्णधार बनला. विराट कोहली 2008 च्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होता आणि 2011 ते 2023 दरम्यान त्याने आरसीबीचा कर्णधार म्हणून 143 आयपीएल सामने खेळले. विराटने 11 मे 2011 रोजी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध आयपीएलमध्ये आपल्या कर्णधारपदाची सुरुवात केली होती. त्यावेळी 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 34 चेंडूंत नाबाद 39 धावांची खेळी करून आपल्या संघाला 9 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता.

Comments are closed.