ईशान किशनकडे कर्णधारपदाची धुरा! विश्वचषकाआधी ‘या’ स्पर्धेमध्ये गाजवणार मैदान
टी-20 विश्वचषक 2026 आणि न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ईशान किशनची (Ishaan kishan) भारतीय संघात निवड झाली आहे. तब्बल 2 वर्षांनंतर त्याचे टीम इंडियात पुनरागमन झाले असून, त्याने आपला शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता. आता ईशानवर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विश्वचषकापूर्वी त्याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
आगामी विजय हजारे ट्रॉफी 2025-26 साठी ईशान किशनची झारखंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ईशानने शानदार कामगिरी करत आपल्या नेतृत्वाखाली झारखंडला विजेतेपद मिळवून दिले होते. त्याच्या कर्णधारपदाचे जगभरात कौतुक झाले, तसेच त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 517 धावा ठोकल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडचा संघ आपला पहिला सामना 24 डिसेंबरला कर्नाटकविरुद्ध खेळणार आहे. साखळी फेरीत या संघाला एकूण 7 सामने खेळायचे आहेत.
झारखंड संघ:
ईशान किशन (कर्णधार व यष्टिरक्षक), विराट सिंह, उत्कर्ष सिंह, कुमार कुशाग्र (उपकर्णधार व यष्टिरक्षक), रॉबिन मिंज, अनुकूल रॉय, शरणदीप सिंह, शिखर मोहन, पंकज कुमार (यष्टिरक्षक), बाला कृष्णा, एमडी कौनैन कुरैशी, शुभ शर्मा, अमित कुमार, मनीषी, अभिनव शरण, सुशांत मिश्रा, विकास सिंह, सौरभ शेखर, राजनदीप सिंह, शुभम सिंह.
Comments are closed.