संघात मोठी उलथापालथ! इशान किशन बाहेर, अन् ज्याने इंग्लंडमध्ये बॅट उचललीही नाही तो झाला कर्णधार

इशान किशनने दुलेप ट्रॉफी 2025 ला नाकारले: दिलीप ट्रॉफी ही भारतीय क्रिकेटमधील एक प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा दरवर्षी देशातील विविध प्रादेशिक संघांमध्ये खेळली जाते. यावेळी स्पर्धांची सुरुवात 28 ऑगस्टपासून बंगळुरूमध्ये होत आहे. या प्रतिष्ठित स्पर्धेत एकूण 6 संघ उतरतील. पण या मोठ्या देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच ईस्ट झोनला मोठा धक्का बसला आहे.

भारताचा स्टार विकेटकीपर-फलंदाज इशान किशन दिलीप ट्रॉफीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्याची ईस्ट झोनच्या कर्णधारपदी निवड झाली होती, मात्र आता तो दिलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नाही. त्याच्या जागी पर्याय खेळाडू जाहीर करण्यात आला असून नवीन कर्णधाराचीही घोषणा झाली आहे.

ईस्ट झोनला मोठा धक्का, इशान किशन बाहेर

इशान किशन स्पर्धेतून बाहेर का पडला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या जागी ओडिशाचा 20 वर्षीय विकेटकीपर-फलंदाज आशीर्वाद स्वेनला संघात स्थान देण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा ओडिशा क्रिकेट असोसिएशनने त्यांच्या एक्स हँडलवर केली. इशानच्या अनुपस्थितीत बंगालचा अनुभवी फलंदाज अभिमन्यु ईश्वरन ईस्ट झोनचा कर्णधार (Abhimanyu Easwaran New Captain East Zone squad) असेल. नुकताच तो इंग्लंड दौर्‍यावर भारतीय कसोटी संघाचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

अभिमन्यू ईश्वरनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी

अभिमन्यू ईश्वरनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 103 सामने खेळले आहेत ज्यात त्याने 48.70 च्या सरासरीने 7841 धावा केल्या आहेत. या दरम्यान, ईश्वरनच्या बॅटमधून 27 शतके आणि 31 अर्धशतके आली आहेत. त्याच वेळी, 233 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. या जबरदस्त आकडेवारीकडे पाहिल्यानंतर, हे स्पष्ट होते की ईश्वरनमध्ये प्रतिभेची कमतरता नाही. तो फक्त संधीची वाट पाहत आहे. तो 2021 मध्ये पहिल्यांदाच भारतीय संघाचा भाग बनला. त्यानंतर तो अनेक वेळा संघात सामील झाला आहे, परंतु त्याला राष्ट्रीय संघाची जर्सी घालण्याची संधी मिळाली नाही.

आशीर्वाद स्वेनची आकडेवारी

आशीर्वाद स्वैनने आतापर्यंत 11 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. 21 डावांत त्याने 30.75 च्या सरासरीने 615 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च स्कोर 77 आहे, तसेच त्याच्या खात्यावर 3 अर्धशतके आहेत. याशिवाय, त्याने 32 झेल आणि 3 स्टम्पिंगही केली आहेत.

ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोन पहिला सामना (East Zone vs North Zone)

दिलीप ट्रॉफी 2025 मधील पहिला उपांत्यपूर्व सामना ईस्ट झोन आणि नॉर्थ झोन यांच्यात होणार आहे. हा सामना 28 ते 31 ऑगस्टदरम्यान बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळवला जाईल. नॉर्थ झोनचे नेतृत्व टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल करणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.