ईशान किशनची इंग्लंडमध्ये चमकदार सुरुवात, पहिल्याच डावात झळकावले दमदार अर्धशतक!
भारतीय संघाचे फलंदाज जिथे दुसऱ्या डावात धावा करण्यासाठी मार्ग शोधत होते (Test series Ind vs Eng) . तिथेच इंग्लंडच्या मैदानावरच यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनच्या (Ishaan Kishan) बॅटने शानदार फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. किशनने नॉटीघमशायर संघासाठी काउंटी चैंपियनशिपमध्ये त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच शानदार प्रदर्शन करून अर्धशतक झळकावले. आता सोशल मीडियावर ईशान किशन पुन्हा चर्चेचा विषय ठरलेला आहे.
काऊंटी चॅम्पियनशिप 2025 मध्ये नॉटीघमशायर आणि यॉर्कशॉयर संघामध्ये सामना खेळला जात होता, जिथे फलंदाजी करत असलेल्या नॉटीघमशायर संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनने पदार्पण केले. त्याच्या पदार्पणाच्या डावातच ईशानने चौकारांच्या पावसासोबत अर्धशतक झळकावले. त्याने 80 चेंडू 67 धावा केल्या, या दरम्यान त्याने 10 चौकार सुद्धा झळकावले. यादरम्यान त्याने प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध शानदार पद्धतीने फलंदाजी केली.
ऑक्टोबर 2023 पासून ईशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. मागच्या 18 महिन्यांपासून तो पुन्हा टीम इंडिया (Team india) संघात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या खेळाडूला पुन्हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान तर दिले आहे, पण अजून तो संघात परतलेला नाही.
या गोष्टीची दक्षता घेत किशनने काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतलेला आहे. नॉटीघमशायर संघासाठी धावा करून तो पुन्हा टीम इंडियामध्ये त्याचे स्थान बनवण्याचा प्रयत्न करत आहे. ईशानने मागच्या एका वर्षामध्ये घरेलू क्रिकेटमध्ये सुद्धा धावांचा पाऊस पाडलेला आहे, ज्याच्या कारणाने त्याचा आशा वाढलेल्या आहेत.
Comments are closed.