इशान किशनचा धडाका कायम! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत शानदार फॉर्ममध्ये झळकावलं अर्धशतक

सध्या भारतीय संघातून बाहेर असलेला इशान किशन (Ishaan kishan) जोरदार फॉर्ममध्ये आहे. तो सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025-26 मध्ये खेळत आहे आणि या स्पर्धेत त्याने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 14 डिसेंबर रोजी झालेल्या सामन्यातही त्याने आपल्या फलदाजीने एक शानदार अर्धशतकी खेळी केली. यापूर्वीही त्याने दमदार फलंदाजी करून सर्वांना प्रभावित केले आहे.

झारखंडकडून सलामीवीर म्हणून उतरलेल्या इशान किशनने कमाल केली. त्याने फक्त 30 चेंडूत 63 धावांची झंझावाती खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 210 होता. या स्पर्धेतील त्याची एकूण कामगिरी पाहिली तर, त्याने यापूर्वी पंजाबविरुद्ध 47, तामिळनाडूविरुद्ध 2, उत्तराखंडविरुद्ध 21, सौराष्ट्रविरुद्ध 93 आणि त्रिपुरा विरुद्ध 113 धावांची खेळी केली होती. अशा प्रकारे, त्याने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांत 1 शतक आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.

इशान किशनने शेवटचा सामना भारतासाठी 2023 मध्ये खेळला होता. तो 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही भारतीय संघाचा भाग होता. मात्र, 2024 आणि 2025 ही दोन वर्षे त्याच्यासाठी चांगली राहिली नाहीत, कारण या दोन वर्षांत तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा भाग बनू शकला नाही.

त्याने भारतासाठी 2 कसोटी सामन्यांत 78 धावा केल्या आहेत. 27 एकदिवसीय सामन्यांत 42.40 च्या सरासरीने 933 धावा केल्या आहेत. 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 25.67 च्या सरासरीने 796 धावा केल्या आहेत.

Comments are closed.